प्रकाश परब यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सावंतवाडी : जिल्हा बँकेचे संचालक, जि. प.माजी सदस्य तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश परब (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सावंतवाडीतील स्वार हॉस्पिटलमध्ये सायंकाळी चार वाजता दुःखद घटना घडली. खासदार विनायक राऊत यांच्या सकाळपासून सुरु झालेल्या दौऱ्यात परब सहभागी होते. दुपारी येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर परब यांच्या छातीत अचानक दुखू लागले. परब हे अनेक वर्षे राजकिय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय होते. जिल्हा बँकेचे परब विद्यमान संचालक होते . परब यांच्या दुःखद निधनाने तळवडे गावावर शोककळा पसरली आहे. तळवडे गावाचे शिल्पकार म्हणून परब यांची ओळख आहे. स्वच्छतेच्या अभियानात तळवडे गावाला राज्यस्तरावर ओळख दिली होती. परब  यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परब यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताचक्षणी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वार हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. परब यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन  भाऊ असा परिवार आहे. बुधवारी सकाळी ११वाजता तळवडे गावात अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • सावंतवाडी
  • 23-10-2018 13:11:02
  • 65

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

..|● शुभ दिपावली ●|.... पूर्ण बातमी पहा.

जिल्ह्यातील तलाठी साझे व महसूली मंडळांची पुनर्रचना.. पूर्ण बातमी पहा.

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.