प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी

कुडाळ:-

कोणतीही पूर्वकल्पना न देता दिलीप बिल्डकॉन कंपनीने तेर्से बांबर्डे माळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षिका दीपा दत्ताराम शेणई यांचे घर जमीनदोस्त  करून टाकले त्यांची जमीन व घर महामार्गाच्या चौपदरीकरणाला संपादित झाली आहे. पण त्याची रक्कम त्यांना मिळालेली नाही. त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे असे असताना दादागिरी करून दिलीप बिल्डकॉन कंपनीने हे घर पाडून टाकले.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.  भूसंपादन ही मोठ्या प्रमाणात केल्यानंतर बरीच प्रकरणे ही न्यायप्रविष्ट तसेच काही प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित आहेत. काही जणांना या गेलेल्या जमिनी व इमारतींचे पैसे सुद्धा मिळालेले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी काम न करण्याचे आदेशही प्रशासनाचे आहेत. मात्र या प्रशासनाच्या आदेशांना धुडकावून  दिलीप बिल्डकॉनने जोरजबरदस्तीने रस्त्याचे काम करण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय तेर्सेबांबर्डे मळावाडी येथील दिपा शेणई यांना आला. दिपा शेणई यांचे घर व आजूबाजूची जमीन ही महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित झालेली आहे. मात्र त्यांना या जमिनीचा तसेच इमारतीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यासाठी त्यांनी तहसिलदार, प्रांताधिकारी यांच्या जवळ अर्ज केलेले आहेत. संपादन झालेल्या जमिनीमध्ये त्यांचे घर आहे आणि त्यात ते राहतात त्यांची मुले कामानिमित्त बाहेरगावी असतात. आज (गुरुवार) श्रीमती दिपा शेणई कामानिमित्त कुडाळ तहसिल कार्यालय येथे संध्याकाळी चार वाजता गेल्या होत्या. त्या ठिकाणी असलेल्या प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी तहसिलदार मुसळे यांना मोबदल्या  संदर्भात भेटल्या होत्या त्याच दरम्यान त्यांचे घर दिलीप बिल्डकॉन कंपनीने जमीनदोस्त केले. या घराला त्यांनी कुलूप लावले होते. मात्र त्याची कोणतीही खबरदारी किंवा पुर्वसुचना न देता हे घर दिलीप बिल्डकॉनचे रवी यादव यांनी जबरदस्तीने पाडले. या घरातील मौल्यवान वस्तू सुद्धा गायब केल्या हे घर कोणतीही पूर्वसूचना न देता पाडल्याने ज्येष्ठ नागरिक असलेल्या दिपा शेणई यांचा वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात  कुडाळ पोलीस ठाणे येथे त्यांनी तक्रारी अर्ज दिला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

  • कुडाळ
  • 11-10-2018 15:48:21
  • 442

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.

भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन.. पूर्ण बातमी पहा.