केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विनोद तावडे

मुंबई:-

केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रमात कार्यरत असताना केंद्र प्रमुखांनी प्रशासकीय अधिकारी नाही तर शिक्षणदूत म्हणून काम करावेअसे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केले.

केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम येथील हॉटेल विवांता येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. तावडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. सुनील मगरउपसंचालक नेहा बेलसरेयुनिसेफ महाराष्ट्रातील प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर,युनिसेफच्या शिक्षण विभागाच्या भारतातील प्रमुख युफ्रेंटस ओसी,युनिसेफच्या महारष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ डॉ. रेश्मा अग्रवाल तसेच राज्यातील गटशिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख उपस्थित होते.

यावेळी  श्री. तावडे म्हणालेकेंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम सुरु झाल्यापासून महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात प्राथमिक स्तरावर  प्रगती केली आहे. माध्यमिक स्तरावर आणखी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र प्रमुखाने अध्ययन निश्चितीसाठी पायाभूत विश्लेषण करावे. शेवटच्या पातळीवरील विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढेल आणि शैक्षणिक विकास होईल याकडे लक्ष द्यावे.

विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी कसे शिकवावे याबाबत शासनाने वेळोवेळी नियम केले आहेत. युनिसेफ ही त्याचप्रमाणे काम करीत आहे. केंद्र प्रमुखाने आपल्यातील शिक्षक सतत जागा ठेवून मुलांना अधिकचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा. त्याच बरोबर प्रभावी निरिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करावा. त्यामुळे आपल्याला शैक्षणिक प्रगती साधता येईल.

श्री. तावडे यांच्या हस्ते केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमाचे सादरीकरण आणि  कार्यक्रम पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व उपक्रमातील 18 तज्ज्ञ सुलभक ( मासटर फॅसिलिटेटर ) यांना बॅच लावून सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. तावडे यांनी तज्ज्ञ सुलभक यांना प्रत्यक्ष काम करण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन ही दिले.

डॉ. मगर आणि श्रीमती बेलसरे यांनी केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमाचे उद्द‍िष्टकार्यक्रमाचा आराखडा यांचा आढावा घेतला. युनिसेफच्या श्रीमती ओसी यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

  • मुंबई
  • 11-10-2018 14:50:00
  • 68

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.