स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे

सिंधुदुर्गनगरी:-

रस्त्यावर तपासणी सुरू असलेली दिसली की हेल्मेट घालायचे, चार चाकी असेल तर सिट बेल्ट लावायचे या पेक्षा स्वत: च्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन सर्व वाहनचालकांनी करण अत्यंत आवश्यक आहे, असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी येथे व्यक्त केले.

मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने येथील पत्रकार कक्षात आयोजित वार्तालाप व खाते परिचय या उपक्रमात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी श्री शिंदे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यप्रणाली बरोबरच नवीन उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

केवळ दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी बहुतांश वाहनचालक तात्पुरत्या उपायांची अंमलबजावणी करतात पण, स्वतःच्या अमुल्य जीवनाची त्यांना म्हणावी तितकी काळजी नसते. यामुळे अपघातात प्राणाची किंमत मोजावी लागते असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, यासाठीच मी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. हायस्कूल, शाळा मधून शिक्षण घेत असलेल्या मुलांना वाहतुक नियमांची माहिती दिली जाते. इच्छुक शाळांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, सुट्टी असेल व शाळा इच्छुक असेल तर सुट्टी दिवशीही मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतुक नियमावलीची माहिती देऊ शकतो.

वाहनाचा वेळच्या वेळी कर भरावा, विमा उतरावा, अधिकृत कंपनीची आय.एस.आय. मार्क असलेली हेल्मेट खरेदी करावी. रस्त्याच्या कडेला हेल्मेट विक्रेत्यांकडून हेल्मेट खरेदी करु नयेत असे स्पष्ट करुन श्री. शिंदे म्हणाले, आता ऑनलाईन पद्धतीने लायसन्स रिन्हव्यू करता येते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एकदा आर.टी.ओ कार्यालयामधील कॅम्प लावले जातात. मोठ्या शहरातही कॅम्प लावण्यात येतात. त्यामुळे तालुक्यातील लोकांची कामे तालुक्यातच होत आहेत. जिल्ह्यात 45 कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दीष्ट होते. हे उद्दीष्ट लवकरच पूर्ण होईल. मार्च 2018 अखेर जिल्ह्यात 2 लक्ष 18 हजार वाहनांची नोंदणी होती. यापैकी 80 टक्के वाहने दुचाकी होती. ट्रान्सपोर्ट वाहने 18 हजार आहेत. ते पुढे म्हणाले, रस्त्यावर वाहने तपासणीचा अनेक वाहनधारकांन त्रास वाटतो. हा त्रास टाळण्यासाठी डी.जी. कॉलर हे ॲप त्यांच्या मोबाईवर डाऊनलोड करुन घेतल्यास तपासणीचं काम अधिक सोप होईल. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही सुविधा आहे. पण सध्या ती कार्यन्वित करणे शक्य नाही. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा असे कटाक्षाने त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

प्रारंभी मुख्यालय संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार बाळ खडपकर यांनी आभार मानले.

  • सिंधुदूर्गनगरी
  • 10-10-2018 16:14:00
  • 65

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.