सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्कुबा डायव्हिंग’ प्रायोगिक तत्वावर सुरु करणार

मुंबई :

कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणाऱ्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास प्रकल्प प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करुन येत्या पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री तथा राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखडा तयार करणे व आराखड्यातील कामांना मंजुरी देण्याकरिता ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार आज कोकणातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, वैभव नाईक, भरत गोगावले, ग्रामविकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव आणि पाचही जिल्ह्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. श्री.भुसे म्हणाले, कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 2013-14 ते 2017-18 पर्यंत ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच  2018-19 वर्षाकरिता पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रस्ताव सादर करताना पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी बस, बोटींग, खाडी किनाऱ्यावरील गावांचा पर्यटन विकास आदी  बाबी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या सूचनांचा समावेश करुन नवीन प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावांना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वित्त राज्यमंत्री श्री.केसरकर म्हणाले, कोकणातील पाचही जिल्ह्यांच्या ग्रामीण पर्यटन विकासाचे सर्वंकष असे एकच मॉडेल तयार करुन प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.

सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग

कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या ठिकाणी पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी उद्योजकांना सबसिडी देण्यात येत आहे.  पर्यटकांचे आकर्षण असलेले ‘स्कुबा डायव्हिंग’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे  सादर करण्यात येणार आहे. यामुळे सिंधुदुर्गातील भूमिपुत्रांना  रोजगार व स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.

  • मुंबई प्रतिनिधी
  • 10-10-2018 05:41:00
  • 792

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारी योजना.. पूर्ण बातमी पहा.

काजू उद्योग मरगळ झटकणार!.. पूर्ण बातमी पहा.

मंत्रालयात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांना अ.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ बचाव समितीला सकारात्मक आश्वासने.. पूर्ण बातमी पहा.

शेकापचे जयंत पाटील म्हणाले....मी सहकारातील दहा पैस.. पूर्ण बातमी पहा.

गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा बसेस .. पूर्ण बातमी पहा.

निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन; ३२० निसर्ग पर्यटन स्.. पूर्ण बातमी पहा.

राज्यातील शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन; कायदेशीर.. पूर्ण बातमी पहा.

एसटीच्या ११४८ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, तड.. पूर्ण बातमी पहा.

तारकर्लीतील स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडी संस्थेमा.. पूर्ण बातमी पहा.