अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानला

सिंधुदुर्ग:

शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला.सदर कर्ज माफ करण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी बँकेच्या संचालक मंडळाने मुंबई येथे जाउन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हा श्री फडणवीस यांनी शिष्ट मंडळाला नारायण राणे यांचा शब्द खाली पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते.

शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठीची बैठक मा. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत 23 लाख 51 हजार शेतकऱ्यांची कर्जे माफ केली असून, त्यापैकी 22 लाख 13 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना दिली. यावेळी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्जे माफ करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. ही कर्जे शेतीसाठी घेऊनही ती कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ देऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी खावटी कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील अंदाजे 62 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेता येणार असून, त्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत http://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ संकेतस्थळावरुन ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. दरम्यान, भूविकास बँकांची कर्जमाफी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात माहिती संकलित करुन, धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मा. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

  • कुडाळ
  • 03-10-2018 21:58:00
  • 778

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.

भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन.. पूर्ण बातमी पहा.