तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे काम रोखले.

कुडाळ :-

मुंबई गोवा महामार्गावरील तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले. जो पर्यंत याठिकाणी बोगदा होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होवू देणार नाही. असा पवित्रा घेतला

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर आटोपण्यासाठी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून ब-याच ठिकाणी जबरदस्तीने सुद्धा काम केले जात आहे. याचाच अनुभव तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे आला. तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे बोगदा व्हावा म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सरपंच यांच्या नावे ३ जानेवारी २०१८ रोजी या ठिकाणी बोगदा मंजूर केल्याचे पत्र आले होते. हे पत्र असतानाच दिलीप बिल्डकॉन कडून काल मंगळवारपासून तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे जबरदस्तीने रस्त्याचे काम सुरू केले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हे काम ग्रामस्थांनी रोखले त्यानंतर अधिका-यांशी बोलल्यानंतर आज (बुधवार) सकाळी १० वाजता ग्रामस्थ पुन्हा त्याच ठिकाणी जमा झाले आणि सुरू असलेले काम रोखले. हे काम रोखल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शेडेकर व  दिलीप बिल्डकॉन कंपनीचे रविकुमार हे त्या ठिकाणी दाखल झाले. सुरुवातीला या अधिका-यांनी ग्रामस्थांना भाग दाखवण्याचा प्रयत्न केला तसेच थातूरमातूर उत्तरे देऊन आता हा रस्ता झाला तरी भविष्यात या ठिकाणी जर बोगदा मंजूर झाला तर हा रस्ता तोडून बोगदा आम्ही करू असेही सांगितले. मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन आम्हाला ग्रामपंचायतीला आलेल्या पत्रानुसार या ठिकाणी बोगदा मंजूर झालेला आहे. हा बोगदा झालाच पाहिजे अन्यथा या ठिकाणी काम करू देणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर या अधिका-यांनी वरिष्ठ अधिका-यांशी बोलून काम थांबविले. या अधिका-यांना ग्रामस्थांपुढे नमते घ्यावे लागले. जर हा रस्ता झाला तर ग्रामस्थ यापुढे उग्र आंदोलन करतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही अधिकारी असाल असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे तेर्सेबांबर्डे मळावाडीचा ३०० मीटर रस्त्याचे काम कंपनीला थांबवावे लागले. यावेळी सरपंच संतोष डिचोलकर, उपसरपंच गुणाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य रुपेश कानडे, रामचंद्र परब, महेंद्र मेस्त्री, दिप्ती कानडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय डिचोलकर, मंगेश कानडे, अनिल कानडे, श्यामराव सावंत, श्री. शिर्के, सूर्या कानडे, दिवाकर कानडे, केशव कानडे, अशोक बांबर्डेकर, उदय कानडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कुडाळ
  • 03-10-2018 08:17:00
  • 953

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.