कुडाळ बचाव समितीला सकारात्मक आश्वासने

मुंबई :- कुडाळ तालुका बचाव समितीची बैठक महामार्गाचे मुख्य कार्यक्रम अभियंता श्री. देशपांडे यांच्याशी मुंबई येथे झाली. या बैठकित सकारात्मक चर्चा झाली.

चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यावर कुडाळ तालुका बचाव समितीने विविध मागण्या करण्यास सुरूवात केली. कसाल ते झाराप पर्यंत ग्रामस्थांना सोयीस्कर ठरतील अशा सुविधा देण्याच्या मागण्या होत्या. दरम्यान या संदर्भात अ‍ॅड. निलेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे या महामार्गाचे मुख्य कार्यक्रम अभियंता श्री. देशपांडे यांच्याशी सभा आज (बुधवार) आयोजित केली होती. या सभेला बचाव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले, काका कुडाळकर, गजानन कांदळगांवकर, पत्रकार महेश पावसकर उपस्थित होते. या सभे दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये कुडाळ येथे हॉटेल राज पॅलेस यांचे दरम्यान उड्डान पुल करणे व त्याच्या सुरुवातीपासून शहरात वाहने येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा, तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे अंडरपास बाबत चर्चेवेळी श्री. देशपांडे यांनी स्वत: या ठिकाणी पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सरसकट सर्व्हीस रोड बाबत मात्र त्यांनी आवश्यकतेनुसार काही बदल करण्याबाबत विचार करण्याचे मान्य केले. कसाल हायस्कूल कडील अंडरपास बाबत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची ग्वाही दिली. शेतक-यांसाठी आवश्यक अंडरपास ऐवजी आवश्यक तेथे दुभाजकाच्या ठिकाणी रेफ्युजी एरिया करण्याचे मान्य केले. त्यामुळे सुरक्षित रित्या मध्यभागी थांबता येणार  आहे. पावशी लिंग मंदिर वाचविण्याबाबत चर्चेवेळी आवश्यक बदली जागा गावक-यांनी दिल्यास निर्णय घेता येईल असे स्पष्ट केले. कुडाळ शहरातील सत्यम हॉटेल येथील बसचे बाबत आग्रही मागणी केली असता शहरातच योग्य त्या ठिकाणी बस मार्ग देण्याचे मान्य केले. कसाल ते झाराप यादरम्यान काही बस स्टॉप वाढवून मिळावे अशी मागणी केली असता ती एस. टी. प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या ठिकाणी बस स्टॉप देण्याचे मान्य केले. आवश्यक त्या ठिकाणी मिडियन कट पोलीस प्रशासनाची चर्चा करून देण्याचे मान्य केले. असे सभेला गेलेल्या बचाव समितीच्या सदस्यांनी सांगितले.

  • मुंबई
  • 03-10-2018 08:01:00
  • 618

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारी योजना.. पूर्ण बातमी पहा.

काजू उद्योग मरगळ झटकणार!.. पूर्ण बातमी पहा.

मंत्रालयात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांना अ.. पूर्ण बातमी पहा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्कुबा डायव्हिंग’ प्रायोगिक .. पूर्ण बातमी पहा.

शेकापचे जयंत पाटील म्हणाले....मी सहकारातील दहा पैस.. पूर्ण बातमी पहा.

गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा बसेस .. पूर्ण बातमी पहा.

निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन; ३२० निसर्ग पर्यटन स्.. पूर्ण बातमी पहा.

राज्यातील शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन; कायदेशीर.. पूर्ण बातमी पहा.

एसटीच्या ११४८ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, तड.. पूर्ण बातमी पहा.

तारकर्लीतील स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडी संस्थेमा.. पूर्ण बातमी पहा.