नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील एका लॉजवर आठवडाभरापूर्वी झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही गंभीर दखल घेतली जात नसल्याने स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी सोमवारी दुपारी येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडक दिली आणि या घटने सह पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या नावाने टाहो फोडला व त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला

 

यावेळी स्वाभिमान च्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व संबंधितावर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली तर गृहराज्यमंत्री यांनी अजूनही पीडित मुलीची भेट घेतली नसल्याने याबाबत त्यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली दरम्यान या प्रकरणी लॉज मालकाचा लॉजचा परवाना रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी शिष्टमंडळाला दिली

 

सावंतवाडी मळगाव येथील एका लॉजवर घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कारवाई होण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्या महिला संघटनेने आज येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडक देण्यासाठी जिल्हाभरातून हजारो महिला मुख्यालयात आल्या होत्या ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून या मोर्चाला सुरुवात झाली रणरणत्या उन्हात स्वाभिमानच्या रणरागिणींनी लैंगिक अत्याचार विरोधात एल्गार केला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या नावाने शिमगा केला यावेळी दीपक केसरकर हाय हाय पालकमंत्री कैसा हो नारायण राणे जैसा हो तसेच पालकमंत्री हाय हाय जिल्ह्यात खय दिसणा नाय अशा मर्मभेदी घोषणा देत पालकमंत्र्यांच्या विरोधात टाहो फोडला आणि रणरणत्या उन्हात मोर्चा जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडकला मोर्चा अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येताच पोलिसांनी गेट बंद करून मोर्चा अडवला त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने पत्रिक त जिल्हा पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांची भेट घेत त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत पाढा वाचला आणि सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठी सांस्कृतिक, वैचारिक, साहित्यिक, परंपरा आहे बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशा दिग्गजांनी या जिल्ह्याला वैभवशाली राजकीय परंपरा दिली आहे गेल्या काही वर्षांत मात्र ही परंपरा कलंकित होताना दिसून येत आहे आंबोली सारखे नामवंत पर्यटन स्थळ खून, व्याभिचार, यांनी बदनाम होत आहे सावंतवाडी सारखे शांत सुसंस्कृत संस्थान आज अनेक घटनांनी ढवळून निघाले आहे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात सर्वाधिक गुन्हे बलात्काराच्या घटना घडत आहेत पोलिसांच्या साक्षीने खोटी धाड पडते आहे नुकतीच सावंतवाडी येथील लॉजवर घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे संपूर्ण जिल्ह्यातील सुसंस्कृत आणि विचार करणारी प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आहे जिल्ह्याला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्‍न सर्व विचार करणाऱ्यांना पडलेला आहे एक थंड दहशतवाद सर्वांना भेडसावतो आहे जाणवतो आहे अनेक छेडछाडीच्या घटना लैंगिक अत्याचाराच्या घटना यांनी प्रत्येक माता-भगिनी अस्वस्थ आहे स्वतःला सुरक्षित समजते आहे बेकायदेशीर अनैतिक धंदे वाढत आहेत राजकीय कृपाशीर्वादाने सर्वकाही खपते आहे या भावनेने सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते वागताहेत नुकतीच सावंतवाडी मळगाव येथील एका लॉजवर घडलेली लैंगिक अत्याचाराची घटना याच भावनेतून घडलेली आहे आता राजकीय दबावाला बळी पडणार की निःपक्षपाती पणे तपास करून सदर घटनेतील सर्व जबाबदार घटकांना शासन करणार हाच खरा कळीचा मुद्दा आहे जिल्ह्यातील सर्व महिला जागरूक आहेत त्या सर्व तपास यंत्रणेकडून न्यायाची अपेक्षा करीत आहेत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर पालकमंत्री म्हणून आणि गृहराज्यमंत्री म्हणून सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला त्यांच्याकडून येणाऱ्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण जिल्ह्याचा पूर्वीचा लवकि जपावा आणि पीडित युवतीला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नारी शक्तीला आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की निःपक्षपाती पाने सर्व प्रकरणाचा तपास व्हावा आणि आरोपींना शासन व्हावे अशी मागणी या महिलांच्या शिष्टमंडळाने केली हा धडक मोर्चा म्हणजे महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांच्या नेतृत्वाखाली झाला यावेळी जिप अध्यक्ष रेश्मा सावंत, अस्मिता बांदेकर, सुमेधा पाताडे, मेघा गांगण, संजना सावंत, संध्या तेरसे, प्राची सावंत, गीता परब, प्रीती वाडेकर, प्रज्ञा परब सभापती शारदा कांबळे, सायली सावंत,आरती पाटील, नगरसेविका साक्षी सावंत, अश्विनी गावडे, शीतल आंगचेकर, प्रियंका साळसकर आदी हजारो महिला उपस्थित होत्या.

  • सिंधुदूर्गनगरी
  • 01-10-2018 02:16:00
  • 392

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.