भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन

कुडाळ:-

भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन पावशी येथील तलावांमध्ये झाले. या विसर्जनावेळी कोणत्याही प्रकारची फटाकेबाजींचा वापर करण्यात आला नाही हे विसर्जन इको फ्रेंडली करण्यात आले त्यामुळे भक्तांमध्ये सुद्धा अधिक उत्साह निर्माण झाला होता ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक तब्बल चार तासांनी विसर्जन स्थळी पोहोचली.

कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेले नऊ वर्षे सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने केली जात आहे. यावर्षी हा गणराया १७ दिवस होता विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांनी कुडाळ शहर भक्तिमय करून सोडले होते. जिल्हास्तरीय भजन स्पर्धेने तर अधिक भक्तीमय वातावरण केले. यावर्षी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. आज (शनिवार) सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन होते. सकाळपासून या विसर्जनाची लगबग सुरू झाली होती. सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात भक्तांची गर्दी झाली होती. सिंधुदुर्ग राजाची उत्तर पूजा उद्योजक प्रवीण पावसकर यांनी केली तर विसर्जनावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष विकास कुडाळकर अशोक सावंत जिल्हा महिला अध्यक्ष सौ प्रणिता पाताडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई जिल्हा परिषदेचे माजी सभापती सौ अस्मिता बांदेकर जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल कुडाळ तालुका अध्यक्ष दीपक नारकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे उपनगराध्यक्ष आबा धडाम बांधकाम सभापती ओंकार तेली नगरसेविका सौ संध्या तेरसे नगरसेवक सुनील बांदेकर कुडाळ  शहर महिला अध्यक्ष सौ रेखा कानेकर शहर अध्यक्ष महेश  आळवे आनंद शिरवलकर माजी सभापती संजय वेंगुर्लेकर पणदूर सरपंच दादा साईल रुपेश कानडे रुपेश बिडये पावशी माजी सरपंच श्रीपाद तवटे मालवण नगरसेवक यतीन खोत जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरे माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले बांव सरपंच नागेश परब राकेश नेमळेकर नागेश नेमळेकर विनायक  घाडी रामा मांजरेकर भाई मांजरेकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग राजाच्या दरबारातून विर्सजन मिरवणूक निघाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात कुडाळ गांधी चौक मार्गे डॉ. आंबेडकर पुतळा ते भैरववाडी मंदिराकडून पावशीच्या दिशेने निघाली मिरवणुकीमध्ये महिला पदाधिकार्‍यांनी  फुगडीचा फेर धरला ही राजाची मिरवणूक पूर्णपणे इको फ्रेंडली करण्याचा मनोदय सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानने केला होता त्याप्रमाणे कुठेही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली नाही. दरवर्षीप्रमाणे कुडाळ हेल्प ग्रुपच्यावतीने सिंधुदुर्ग राजावर  फुलांचा वर्षाव करण्यात आला तर गांधी चौक येथे श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटी आणि बाजारपेठ मित्र मंडळ यांच्या वतीने सिंधुदुर्ग राजाच्या  मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांना दूध कोल्ड्रिंग वाटप करून सेवा करण्यात आली.

सिंधुदुर्ग राजाची मिरवणूक निघाल्यावर प्रत्येक ठिकाणी महिला तसेच इतर गणेश भक्तांनी राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती कुडाळ पंचायत समितीच्या ठिकाणी आल्यावर सभापती राजन जाधव यांनी सपत्नीक दर्शन घेऊन गणरायाला पुष्पहार अर्पण केला यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक पावशी त्याला बाबत गेल्यानंतर त्या ठिकाणी गणरायाची महाआरती करण्यात आली त्यानंतर गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले हे विसर्जन पाहण्यासाठी गणेश भक्तांनी तोबा गर्दी केली होती

  • कुडाळ
  • 29-09-2018 07:43:00
  • 363

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.