अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसुल विभागाने धडक कारवाई

कुडाळ (प्रतिनिधी)

नेरूरपार येथे होणा-या अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसुल विभागाने धडक कारवाई सुरू केली. ज्या ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खनन केले जाते त्या रॅम्पकडे जाणा-या रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने चर मारून हे रस्तेच बंद करून टाकले. मात्र हि कारवाई उशीराने झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. तक्रारी गेल्यावरच महसूल विभागाला जाग येते का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

    कुडाळ तालुक्यातील वाळू उत्खननाच्या परवानग्यांची मुदत संपली तरी चोरीची वाळू सुरू होती. राजरोस हि चोरी होत असताना मात्र महसूल विभाग गप्प होता. प्रशासनाच्या नजरेखालून बेकायदा वाळू उत्खनन व वाहतुक सुरू होती. ना महसूल विभाग कारवाई करीत होता ना पोलीस यंत्रणा कारवाई करत होती. अनधिकृत वाळू उत्खनन सुरू होते हे यंत्रणांना माहित होते. अखेर नेरूरपारमध्ये अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याची तक्रार झाल्यावर मात्र प्रशासनाने अनधिकृत वाळू उत्खनन करणा-यांना सावध करीत आज (मंगळवार) कारवाई करण्यास सुरूवात केली. नेरूरपार येथील तीन रॅम्पवर कारवाई केली. १ रॅम्प शासकिय जागेत आहे तर २ रॅम्प हे खाजगी मालकिच्या जागेत आहेत. मात्र त्या जमीन मालकांवर कारवाई न करता त्या रॅम्पकडे जाणा-या रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने चर खोदले. आणि रॅम्पकडे जाणारे रस्ते शासकिय पध्दतीने बंद केले यावेळी वालावल सर्कल संतोष गुरखे, नेरूर तलाठी यू. एम. परब, चेंदवण तलाठी एस. एस. गुजर, सरंबळ तलाठी पी. आर. राहठे, वालावल तलाठी आर. एस. खंडागरे, आंदुर्ले तलाठी एस. बी. दरेकर, पाट तलाठी एस. एस. जाधव, नेरूर पोलीस पाटिल गणपत मेस्त्री, कोतवाल एन. सी. मोंडकर, आर. आर. गोसावी आदी उपस्थित होते.

  • कुडाळ
  • 25-09-2018 12:14:00
  • 304

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.