हरीनामाच्या माध्यमातून प्रबोधन - दत्ता सामंत

कुडाळ (प्रतिनिधी)

हरी नामाची भक्ती ही मनापासून केली तर त्याचे फळ निश्चितच चांगल मिळत असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सांगून या  हरिनामाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात असे त्यांनी यावेळी सांगितले. ही जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २७ सप्टेंबर पर्यंत राजाच्या दरबारात असणार आहे. 

 कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात यावर्षी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने केले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत व उद्योजक संदेश शिरसाट यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज (सोमवार) महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत व ज्येष्ठ  भजनी बुवा व भजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी जिल्हा परिषद सभापती सौ. अस्मिता बांदेकर, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, परीक्षक संजय आठल्ये, गजानन देसाई, माजी सरपंच अरविंद शिरसाट, रत्नागिरी येथील बुवा नारायण मिर्जोळकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास चव्हाण, दशावतारी आनंद कोरगावकर, भजनी बुवा रवींद्र गोसावी, कुडाळचे नगरसेवक सुनील बांदेकर, कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक, राजेश महाडेश्वर, संजय करलकर, मिलिंद देसाई, श्रीपाद तवटे, वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनचे सचिव सुनील पालव आदी उपस्थित होते. 

    या भजन स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून झाल्यानंतर या भजन स्पर्धेनिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी सांगितले की, मी सुद्धा एक भजनी बुवा होतो. वीस वर्षांपासून या भजन संप्रदायात मी भजन म्हटलेले नाही तेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळी भजनी बुवा असताना लोकांना भजनातून साधु संतांचे विचार सांगत होतो पण त्याच वेळी प्रत्येक आठवड्याला माझ्यावर गुन्हेही दाखल होत होते. त्यामुळे जे आपण प्रबोधन करतो त्याच्या विरुद्ध समाजात  वागतो हे जेव्हा माझ्या लक्षात आले त्यावेळी या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे मी सोडले पण या  हरिनामाच्या माध्यमातून प्रबोधनाचे विचार हे लोकांपर्यंत जावेत म्हणून विविध स्पर्धा आम्ही गेले काही वर्ष आयोजित करीत आहोत. सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात पहिल्यांदाच भजन स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ठिकाणी जे आम्ही बी पेरणार आहोत तेच बी उद्या चांगले फळ देणार आहे. हा गणपती कोणत्या पक्षाचा नसून हा सिंधुदुर्ग जिल्हावासियांचा गणपती आहे. आणि या ठिकाणी जिल्ह्याला सुखसमृद्धी मिळावी म्हणूनच आम्ही प्रार्थना करत आहोत. असे सांगून हरिनामाचा जप जेव्हा श्रद्धेने केला तर निश्चितच त्याचे चांगले फळ मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले तर आभार कुडाळ तालुकाध्यक्ष दिपक नारकर यांनी मानले.

  • कुडाळ
  • 24-09-2018 08:59:00
  • 249

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.