आज जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे होणार उद्घाटन

कुडाळ (प्रतिनिधी)

कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्यावतीने प्राणप्रतिष्ठापना केलेल्या सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि कुडाळचे उद्योजक संदेश शिरसाट पुरस्कृत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन दि. २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. 

   

सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहे. या भजन स्पर्धेमध्ये सोमवार दि. २४ सप्टेंबर रोजी आडेली येथील ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ बुवा दिव्या दुतोंडकर, हरकुळ बुदु्रक येथील गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा अमोल घाडीगांवकर, हरकुळ बुदु्रक येथील कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा सुजित परब, डिगस येथील चव्हाटेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा हर्षदा दुखंडे, कलमठ येथील काशीकलेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा चेतन गुरव, मातोंड येथील विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ बुवा दिपक मेस्त्री, मंगळवार दि. २५ सप्टेंबर रोजी पिंगुळी येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ रूपेश येमकर, मांडकुली येथील लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा दिपक खरूडे, कुडाळ येथील भालचंद्र सोहम भजन मंडळ बुवा महेश वेंगुर्लेकर, वडखोल येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ बुवा परूषोत्तम परब, तळवडे येथील सिध्देश्वर उदिनाथ प्रासादिक भजन मंडळ बुवा उदय नागदे, नागवे येथील मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा अमेय आरडेकर, बुधवार दि. २६ सप्टेंबर रोजी  भोगवे येथील ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ बुवा मदन करलकर, बांव येथील भगवती प्रासादिक भजन मंडळ बुवा लक्ष्मण नेवाळकर, पिंगुळी येथील महापुरूष प्रासादिक भजन मंडळ बुवा प्रसाद आमडोसकर,  भोगवे येथील महापुरूष प्रासादिक भजन मंडळ बुवा तुषार खुळे, कुडाळ येथील सद्गुरू संगीत भजन मंडळ बुवा वैभव सावंत, तांबोळी येथील स्वरधारा संगीत भजन मंडळ बुवा अमित तांबोळकर, गुरूवार दि. २७ सप्टेंबर रोजी  भोईचे केरवडे येथील जगन्नाथ प्रासादिक भजन मंडळ बुवा संदेश बांदेलकर, निवजे येथील निवजेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा महेंद्र पिंगुळकर, वैभववाडी येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ बुवा विकास नर, पाट पंचक्रोशीतील रामकृष्ण हरी भजन सेवा संघ बुवा आशिष सडेकर, वडखोल येथील गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ बुवा रूपेंद्र परब यांची भजने होणार आहेत. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

  • कुडाळ
  • 24-09-2018 01:08:00
  • 537

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.