कोकण रेल्वेतील चोरीतील चोरटे गजाआड

कुडाळ :- कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या लांब पल्ल्याच्या कोकणकन्या, मत्स्यगंधा, अशा गाडयांमधील प्रवाशांचे दागिने, पैसे तसेच इतर साहीत्य चोरणार्या संशयित तिघांना बीड, कोल्हापुर व हिंगोली येथुन अटक करण्यात सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असुन लवकरच या टोळीचा पर्दापाश होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या एक महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावरून लांब पल्ल्याच्या धावणार्या यामध्ये विशेष करून कोकणकन्या, मत्स्यगंधा, अशा गाडयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या मुद्देमालाची चोरी होत होती. सदरच्या या चोर्या करताना हे चोरटे गुंगीकारक पेय देवून प्रवाशांना लुटत होते. तसेच गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांचे ही साहीत्य लपांस करीत होते. या प्रकरणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणी तिन्ही जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस या.चोरट्यांचा तपास करीत होते. सदरच्या चोरट्यांचा तपास करीत असताना सिंधुदुर्ग च्या स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला या प्रकरणातील संशयित चोरट्यांची माहीती मिळाली. या माहीती नुसार या पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवीराज फडणीस व त्यांच्या टिमने या प्रकरणी संशयित चोरटे प्रकाश नागरगोजे (वय- २१, रा.बीड), तानाजी शिंदे (वय-२१ हिंगोली), महेश किल्लेदार (वय-२३ कोल्हापुर) यांना अटक केली आहे. या तिघांना ही न्यायालयात.हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असुन या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.

  • कुडाळ
  • 28-08-2018 15:57:00
  • 486

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.