काकांच्या घुसमटीला मार्ग मिळणार का?

कुडाळ :- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले त्यापैकी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर हे त्यातील एक नाव आहे. काका कुडाळकर यांनी राणेंची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले पण या संस्कृतीत काका कुडाळकर टिकू शकले नाहीत त्यांची सध्या घुसमट सुरू झाली आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा आपल्या भाजपचे जिल्हाध्यक्षांजवळ दिला. काका कुडाळकर सध्या नव्या पक्षाच्या शोधात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या चर्चेदरम्यान काका कुडाळकर हे शिवसेना किंवा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता ही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे कुडाळ शहरातील काका कुडाळकर हे सर्वांना परिचित आहेत कुडाळ ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यंत त्यांनी विविध पदे भूषवली राजकीय पटलावरील त्यांना चाणक्य असेही म्हणतात. पण सध्या यात राजकीय चाणक्याचा अभिमन्यू झाल्याची ही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काका कुडाळकर यांनी शिवसेनेपासून काम सुरू केले शिवसेना पक्षातही त्यांनी अनेक पदे भूषविली माजी मुख्यमंत्री नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी काका कुडाळकर सुद्धा त्यांच्यासोबत काँग्रेसवासी झाले पण ते काही काळच काँग्रेसमध्ये टिकू शकले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा प्रवेश फक्त एका रात्रीचा ठरला सकाळी त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपने यांना पदे दिली पण सातत्याने त्यांच्या नेतृत्व बद्दल साशंकता निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देणे टाळले. आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम भाजपच्या मंडळींनी केल्यामुळे त्यांची भाजपमध्ये घुसमट सुरू झाली. भाजपच्या चक्रव्यूहात सापडलेल्या काका कुडाळकर यांना भाजपमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. एकेकाळी राजकीय पटलावरील धुरंदर कार्यकर्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या काका कुडाळकरांची भाजपच्या वर्तुळात मात्र घुसमट करून टाकली. त्या काळात काका कुडाळकर व संजय पडते यांची जोडी म्हणजे दो हौंसोका जोडा अशीच होती. संजय पडते यांचे संघटन आणि काका कुडाळकर यांचे गोळा बेरजेचे राजकारण होते. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेले हे कार्यकर्ते होते. अशा या पुढा-यांची आता घुसमट होत आहे. या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी आता काका कुडाळकर यांनी दुसऱ्या पक्षांचा शोध सुरू केला आहे आणि याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काका कुडाळकर यांनी आपला प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेस समोर आणि शिवसेनेसमोर ठेवलेल्याची चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे. यामध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रीय का काँग्रेस पक्षाकडे अशी मागणी ठेवल्याचे समजते की २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुडाळ- मालवण मतदारसंघाची उमेदवारी मिळावी तर शिवसेनेकडे जिल्हाप्रमुख हे पद मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आता राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना कोणता निर्णय घेते याकडे काका कुडाळकर यांचे लक्ष आहे पण दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडून आपल्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळे काका कुडाळकर हे या राजकीय घुसमटीतून बाहेर कधी येतील हा येणारा काळच ठरवणार आहे

  • कुडाळ
  • 23-08-2018 15:02:00
  • 589

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.

मराठा समाजाच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे.. पूर्ण बातमी पहा.

खरोखरच अभिनंदनीय काम....पण.. पूर्ण बातमी पहा.

..|● शुभ दिपावली ●|.... पूर्ण बातमी पहा.

जिल्ह्यातील तलाठी साझे व महसूली मंडळांची पुनर्रचना.. पूर्ण बातमी पहा.

प्रकाश परब यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निध.. पूर्ण बातमी पहा.

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.