मराठी माणसाच्या जीवावर दोन मातोश्री - नारायण राणे

सिंधुदूर्गनगरी :- भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व पक्ष लोकहितकारी राज्य बनवण्यास असफल राहिल्यामुळेच मला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची निर्मिती करावी लागली असे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांनी सांगून यापुढे महाराष्ट्र स्वभिमान पक्ष देशभरातही लोकहितकारी कार्य करीत राहील अशी ग्वाही त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीवेळी दिली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ आज सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे तसेच जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, संदीप कुडतरकर, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, मधुसूदन बांदिवडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शुभारंभप्रसंगी माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे या पक्षाचे पहिले सभासद झाले त्यानंतर कार्यकर्त्यांनी सभासद होण्यासाठी गर्दी केली या सभासद नोंदणी वेळी येत्या ५ सप्टेंबर पर्यंत १ लाख सभासद नोंदणी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जाणार असल्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले की इतर राजकीय पक्षांकडून लोकहितकारी कामे होत नाहीत हि काम करण्यासाठीच स्वाभिमान पक्षाची निर्मिती केली आहे हा पक्ष देशभर कार्यरत राहील येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वाभिमान पक्ष अनेक जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली शिवसेना आणि शिवसेनेसाठी मराठी माणूस झटत राहिला पण याच शिवसेनेच्या कालखंडात मराठी माणूस मुंबईतून बाहेर निघून गेला आहे मुंबई शहरांमध्ये मराठी माणूस आहे तरी कुठे मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून उद्धव ठाकरे यांनी एक नाही तर दोन मातोश्री उभारले आहेत जर उद्धव ठाकरे मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई येथे आमने-सामने यावे आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावी असे आव्हान त्यांनी यावेळी दिले तसेच ते म्हणाले की माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा पदापेक्षा सर्वसामान्यांची सेवा करणारा असावा असे त्यांनी सांगितले. या नोंदणी शुभारंभ वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पत्नी सौ निलमताई राणे यासुद्धा पक्षाच्या सभासद झाल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन बांदिवडेकर यांनी केले.

  • सिंधुदूर्गनगरी
  • 20-08-2018 16:34:00
  • 284

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.