सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे प्रोत्साहनात्मक पुरस्कार जाहीर

कुडाळ (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर सहकार क्षेत्रात काम करणा-या संस्था, सहकारी संस्था, पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांनी उत्साहाने काम करण्यासाठी तसेच त्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे. यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची, प्रोत्साहनाची थाप मिळणे आवश्यक असते. त्यासाठी सहकारी संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहाकारातील कर्मचारी व शेतकरी यांच्यासाठी जिल्हा बँके मार्फत प्रोत्साहनात्मक पुरस्कार योजना सन २०१६ पासून सुरु करण्यात आलेली आहे. यावर्षीच्या पुरस्कारानुषंगाने संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी बँकेने तज्ञ व्यक्तींची पुरस्कार निवड समिती गठीत केलेली होती. या पुरस्कार निवड समितीने उत्कृष्ट सहकारी संस्था, उत्कृष्ट संस्था पदाधिकारी, उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी व शेतकरी यांनी केलेले कामकाज व त्यांचे कार्य यांचे मुल्यमापन करुन खालीलप्रमाणे संस्था व व्यक्तिंची पुरस्कारांसाठी निवड केलेली आहे. तसेच जिल्हयातील सहकार व विविध देशामध्ये उल्लेखनीय काम केलेले माजी आमदार श्री.पुष्पसेन शिवाजी सावंत यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. स्व. बाळासाहेब सावंत यांचे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार पुष्पसेन शिवाजी सावंत यांना, कै. शिवराम भाऊ जाधव स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार -मालवण गाबीत समाज पतसंस्था मर्या, मालवण, कै. डी. बी. ढोलम स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार प्रदिप लक्षमण देसाई सचिव सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सह. पतसंस्था मर्यादित ओरोस, कै. केशव रावजी राणे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार, कै. भाई साहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुस्कार दत्ताराम लक्ष्मण खोत, सदर पुरस्कारांचे वितरण सिंधुदुर्गनगरी "शरद कृषी भवन " येथे बँकेच्या दि. ३१ आॅगस्ट रोजी होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले जाणार असून हा वितरण सोहळा बँकींग क्षेत्रातील तज्ञ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक तसेच को. आॅफ. बँक फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष आणि नॅफकय चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचे हस्ते होणार आहे.

  • कुडाळ
  • 14-08-2018 15:28:00
  • 233

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.