तुम्हाला विधीमंडळात पाहण्याची इच्छा - राजन जाधव

कुडाळ :- राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो याचाच प्रत्यय कुडाळ पंचायत समिती मध्ये आला निमित्त होते ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे. या अभिष्टचिंतन कार्यक्रमांमध्ये मंचकावर राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या बद्दल कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये रणजित देसाई यांच्या बद्दल त्यांनी स्तुतिसुमने उधळली आम्ही जिल्हा परिषद मध्ये जेव्हा सभा निमित्त जातो त्यावेळी रणजित देसाई हे आम्हाला सहकार्य करतात ते पक्षपात करत नाहीत आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असलो तरी आम्हाला सुद्धा समान न्याय त्यांच्याकडून मिळतो कुणालाही नाराज न करणारे हे नेतृत्व आहे त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आमचा पक्षविरहित असून भविष्यात होणाऱ्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये रणजित देसाई हे उमेदवार असले तर आमचे त्यांना सहकार्य लाभेल आणि आम्हाला त्यांना भविष्यात विधिमंडळात पाहण्याची संधी मिळेल अशा प्रकारचे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व विधिमंडळात आवश्यक आहे असे राजन जाधव यांनी सांगून मी जरी शिवसेनेचे पदाधिकारी असलो तरी रणजित देसाई हे विधिमंडळात असावेत अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी मनोगतात व्यक्त केले पंचायत समिती सभापती राजन जाधव हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई आहेत सभापतींच्या या वक्तव्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत एका सत्ताधारी पक्षाचे सभापती दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी आमदार व्हावेत अशी इच्छा निर्माण करण्यामागे नेमके कारण काय या त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात निश्चितच खळबळ माजली आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रमात या राजकीय वक्तव्याची चर्चा दिवसभर पंचायत समिती परिसरात सुरू होती

  • कुडाळ प्रतिनिधी
  • 08-08-2018 15:03:00
  • 177

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.