पावशी येथील वैनगंगा बँक चोरीप्रकरणी चौघांना अटक

कुडाळ:- कुडाळ तालुक्यातील पावशी येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कोकण विदर्भ ग्रामीण (वैनगंगा) बँकेवर दरोडा टाकून बँकेच्या तिजोरीतील सुमारे ५ लाखाच्या रोख रक्कमेसह १० लाखाचे सोन्याचे दागिने मिळून सुमारे १५ लाख रूपयांची चोरी करणा-या चौघांना सोलापूर येथील टेंभूर्ली पोलीसांच्या ताब्यातून घेवून कुडाळ पोलीसांनी वेगुर्ले न्यायालयात हजर केले असता १३ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पावशी ग्रामपंचायत कार्यालया समोरील महामार्गालगत असलेल्या कोकण विदर्भ बँकेमध्ये जुलै महिन्यात चोरी झाली होती. या चोरीच्या तपासासाठी पोलीसांनी पथके तयार केली होती. मात्र पोलीसांना चोर सापडले नव्हते. दरम्यान कोल्हापूर, लातूर, सोलापूर याठिकाणी अशाच प्रकारच्या चो-या झाल्या होत्या. याचा तपासही सुरू होता. हे चोरटे सोलापूर टेंभूर्ली पोलीसांनी पकडले. एकाच प्रकरची चोरी असल्याने कुडाळ पोलीसांनी या चारही चोरट्यांची पावशी चोरीप्रकरणी मागणी केली. त्यानुसार झारखंड साहेबगंज येथील अमृतद्दिन शेख (वय- २४), साजन महुल शेख (वय- ३४) तसेच झारखंड बेगमगंज येथील नाझीर शेख (वय - ३५) व सौदागर शेख (वय- ३४) यांना कुडाळ पोलीसांनी ताब्यात घेतले आणि वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता १३ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणात चौघांचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून याचे म्होरके आंध्रप्रदेशात असल्याचे उघड झाले आहे. अशी माहिती पोलीस निरिक्षक जगदीश काकडे यांनी दिली.

  • कुडाळ
  • 07-08-2018 15:10:00
  • 391

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

दसऱ्या दिवशीही होणार वाहनांची नोंदणी.. पूर्ण बातमी पहा.

प्रकल्पग्रस्तांवर दिलीप बिल्डकाॅनची दादागिरी.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र प्रमुखाने ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करावे- विन.. पूर्ण बातमी पहा.

स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक श.. पूर्ण बातमी पहा.

सुरक्षेसाठी नियमांचे पालन गरजेचे- अशोक शिंदे.. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

अखेर नारायण राणे यांचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फ.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी .. पूर्ण बातमी पहा.

नारीशक्तीने दिली पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक .. पूर्ण बातमी पहा.