महाराष्ट्र राज्यात सिंधु एज्युकेशन एक्स्पोचा पॅटर्न राबविला जाईल

कुडाळ :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सिंधु एज्युकेशन एक्स्पोच्या माध्यमातून जी शिक्षणाची गंगा सुरू केली आहे ती अविरत सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करीत राहील आणि महाराष्ट्र राज्यात सिंधु एज्युकेशन एक्स्पोचा पॅटर्न राबविला जाईल असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सिंधु एज्युकेशन एक्स्पोच्या समारोप कार्यक्रमावेळी व्यक्त केले. या समारोप कार्यक्रमांमध्ये ज्या ज्या व्यक्तीने हा एक्स्पो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सत्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने सिंधु एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन गेले तीन दिवस कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे केले होते. या एक्स्पोला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये जिल्ह्यातील कानाकोप-यातून विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले. तसेच अनेक मान्यवरांनीसुद्धा या एक्स्पोला भट देऊन या एक्स्पोचे कौतुक केले. सिंधु एज्युकेशन एक्स्पो समारोप आज (सोमवार) संध्याकाळी संपन्न झाला. यावेळी मंचकावर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, कणकवली पंचायत समिती सभापती सौ. साटम, कुडाळ पंचायत समिती सदस्या निलिमा वालावलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. भारती संसारे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. कडूस तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी सांगितले की, सिंधु एज्युकेशन एक्स्पो हा यशस्वी होण्यामागे आपली संघटित असलेली ताकद दिसून आली. या एक्स्पोला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे एक्स्पो यशस्वी झाल्याचे समाधान वाटत आहे. हा एक्स्पो भरवण्या अगोदर मनामध्ये भीती वाटत होती कि हा एक्स्पो यशस्वी होईल का पण विद्यार्थ्यांनी हा एक्स्पो यशस्वी करून दाखवला. पुढच्या वर्षी यापेक्षाही नव्या स्वरूपात एज्युकेशन एक्स्पो होईल असे सांगून त्यांनी ज्याप्रमाणे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रासाठी पॅटर्न ठरले. त्याचप्रमाणे सिंधु एज्युकेशन एक्स्पो हा सुद्धा भविष्यकाळात पॅटर्न ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले की, या एक्स्पोमध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थी पालक व शिक्षकांनी सहभाग घेतला. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले पाहिजे. यासाठी एज्युकेशन एक्स्पो प्रयत्न करीत आहे. पुढील चार-पाच वर्षांमध्ये या एक्स्पोच्या माध्यमातून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतील त्याचवेळी हा एक्स्पो यशस्वी झाल्याचे आम्हाला समाधान होईल. दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करिअर कोणते निवडावे यामध्ये भरकटतात पण एक्स्पोमुळे त्यांनाही दिशा मिळेल असे सांगून मराठी शाळांमध्ये फिरताना इंग्रजी भाषेचा अभाव दिसून आला. इंग्रजी भाषा हस्तलिखित करण्यासाठी यापुढील काळात शिक्षण विभाग प्रयत्न करेल असे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. कडूस यांनी मानले

  • कुडाळ
  • 06-08-2018 15:42:00
  • 159

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.