नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे केली-नगराध्यक्ष राणे

कुडाळ:- नगरपंचायतीपेक्षा ग्रामपंचायत बरी होती असे म्हणणा-या नगरसेवकांनी दोन वर्षामध्ये झालेली विकास कामे आणि भविष्यात होणार्‍या विकास कामांची माहिती घ्यावी. असे नगराध्यक्ष विनायक राणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हणून नगरपंचायत क्षेत्राच्या विकासासाठी सुचना किंवा मार्गदर्शन असेल तर त्याचे स्वागत केले जाईल. कुडाळ नगरपंचायतीची निवडणुक पार पडुन दोन वर्षांचा कालावधी झालेला आहे. सदर दोन वर्षाच्या कालावधीत नगरपंचायतीकडून वेगाने विकास कामे होत आहेत. यापुर्वी ग्रामपंचायत असताना निधीच्या मर्यादा येत होत्या. मोठ्या कामांसाठी लोकवर्गणीद्वारे स्वहिस्सा भरावा लागत होता. परंतु नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर लोकवर्गणीची अट नसल्याने विविध अनुदानातुन कामे हातात घेतली जात नगरपंचायत निर्णय झाल्यानंतर 2016-17 मध्ये नगरोत्थान योजनेतून 4 कोटी 7 लाख निधी मंजूर झाला असून त्यामधुन 15 रस्ते व पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी 15 रस्त्यांची कामे पुर्ण झाली असुन पाणी योजनेचे काम सुरु आहे. 2017-18 या वर्षात नगरोत्थान योजनेतुन 2 कोटी 20 लाख रु. निधी मंजूर झाला असुन 13 रस्त्ये व 10 गटारांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरची कामे पुढील सहा महीन्यात पुर्ण होणार आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी घरोघरी कचरा सकलन घंटागाईंद्वारे सरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व कुंडया दुर केल्याने शहरातील दुर्गधीची समस्या दुर झालेली आहे. चौदावा वित्त आयोग निधीतून चार घंटागाड्या घेण्यात आल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन अनुदानामधुन मानवी सेवेतुन आठ कंत्राटी सफाई कर्मचार्यांद्वारे वॉईनिहाय स्वच्छता केली जात आहे. तसेच कचच्यावरील प्रक्रीयेसाठी बायोगॅस प्लॅन्टची उभारणी केली जाणार आहे. स्ट्रीटलाइटची समस्या मिटवण्यासाठी शासनामार्फत नियुक्त केलेल्या EESL या कंपनीमार्फत शहरातील सर्व जुन्या टयूबलाइट, CFL बल्ब बदलुन सर्व ठीकाणी LED बल्ब लावण्याचे काम चार महीन्यात सुरू होणार आहे. नगरपंचायत कार्यालयामध्ये दाखल होणाच्या सर्व प्रकरणामध्ये शासकीय नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. कामे मंजुर होताना तसेच विविध अर्ज निकाली जगरवीकास विभागाद्वारे काढताना निश्चित केलेल्या अटीशर्तीची पुर्तता होणे आवश्यक असते. ग्रामपंचायतीप्रमाणे सदस्यांच्या तोंडी सांगण्यावरुन कोणतीही कागदपत्रे नसताना प्रकरणे मंजुर केली जात नसून शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. कुडाळ गंगारपंचायतीला राज्य संवर्गातील सहाय्यक कार्यालय अधीक्षकमालमत्ता पर्यवेक्षक जनसंपर्क अधिकारी, कर निरीक्षक, लेखापाललेखा निरीक्षक, स्थापत्य अभियंता, स्वच्छता अभियंता, नगररचनाकार अशी नऊ राज्य संवर्गातील पदे मंजुर असुन अदयाप एकही पद भरलेले नाही. ही सर्व पदे रीत असुन देखील उपलब्ध कर्मचान्यांकडुन नगरपंचायतीमार्फत चांगल्या प्रकारचे काम केले जात आहे. पुढील आठ महिन्यात सर्व मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून ग्रामपंचायतीपेक्षा अमूलाग्र बदल आपणास दिसणार आहेत्यामुळे कोणतीही रितसर माहिती न घेता सदस्यांनी ग्रामपंचायत बरी असे लोकांचे म्हणणे आहे असे न म्हणता झालेली विकास कामे लोकांसमोर मांडावीत व सुधारणेसाठी आवश्यक कामे व बदल सुचवल्यास नगराध्यक्ष म्हणून मी निश्चित स्वागत करेन.

  • कुडाळ प्रतिनिधी
  • 12-07-2018 08:11:04
  • 219


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.