निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचा नाणारला विरोध-प्रकल्पग्रस्तांचा आरोप

नागपूर :- रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात गदारोळ झाला. विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध पाहायला मिळाला. विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना आमदारांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली. विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात शिवसेना आमदार, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर सहभागी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्री पाठिंबा देण्यासाठी आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावरुन आंदोलक आणि शिवसेना नेत्यांमध्ये बोलाचाली झाली. नाणारविरोधात विधानसभेत विरोधीपक्षासह शिवसेनेने गोंधळ घातला. या गोंधळातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. नाणार प्रकल्पाविरोधात नागपूर विधीमंडळासमोर धरणं आंदोलन केल्याची माहिती देण्यासाठी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पॉईंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली होती. परंतु विधानसभाध्यक्षांनी ती फेटाळल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली. कामकाज तहकूब झाल्यानंतर आक्रमक झालेले शिवसेनेचे मंत्री थेट विधानभवनाबाहेरील आंदोलनात सहभागी झाले.दरम्यान, नाणार प्रकल्पाविरोधी मोर्चात शिवसेनेने 'भाजप जमीन चोर आहे' अशा घोषणा दिल्या. त्या घोषणा बाहेर देण्याऐवजी सभागृहात द्याव्या. विधान परिषदेत काल मुख्यमंत्री बोलले तेव्हा शिवसेना काही बोलली नाही, आज विधानसभेत नाटक केलं. शिवसेना आणि भाजपची सेटिंग आहे, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना दलाली करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

  • नागपूर
  • 11-07-2018 15:43:21
  • 46


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

पोषण आहारात दूध व दूध भुकटीचा समावेश - महादेव जानक.. पूर्ण बातमी पहा.

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी.. पूर्ण बातमी पहा.

कॉंग्रेसचे मंत्री, प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी श.. पूर्ण बातमी पहा.