पोषण आहारात दूध व दूध भुकटीचा समावेश - महादेव जानकर यांची विधानसभेत माहिती

नागपूर - दूध व दूध भुकटी निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शालेय पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या संदर्भात केलेल्या निवेदनात श्री. जानकर म्हणाले, काल विधानसभेत दुधाच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. यावेळी चर्चेदरम्यान दुधाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय करण्याबाबत घोषणा सभागृहात करण्यात आली होती. त्यानुसार आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयात दूध भुकटीची निर्यात करणाऱ्या उत्पादकांना पुढील दोन महिन्यात निर्यात केलेल्या दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील जे दूध प्रकल्प दुधाची निर्यात करतील त्यांनाही प्रतिलिटर पाच रुपये प्रोत्साहनपर अनुदान पुढील दोन महिन्यांकरिता देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याबाबत धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दुधाच्या उपपदार्थांना अधिक मागणी मिळावी यासाठी तूप तथा लोणी यावरील जीएसटी कमी करण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला. बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, शरद रणपिसे, गणपतराव देशमुख, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, हसन मुश्रीफ, सुरेश धस, चंद्रदीप नरके, राहुल मोटे, सत्यजित पाटील, मनोहर भोईर आणि महानंदचे अध्यक्ष मंदाकिनी खडसे हे उपस्थित होते.

  • नागपूर
  • 10-07-2018 15:39:04
  • 65


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचा नाणारला विरोध.. पूर्ण बातमी पहा.

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी.. पूर्ण बातमी पहा.

कॉंग्रेसचे मंत्री, प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी श.. पूर्ण बातमी पहा.