कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महामार्ग बंद आंदोलन

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुंळे निर्माण झालेल्या समस्या, प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन जनतेच्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने मंगळवार दि. १७ जुलै रोजी संपुर्ण तालुक्यात महामार्ग बंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलन पुर्वतयारीसाठी महामार्ग बाधीत १२ गावात बैठका घेण्याचा ही निर्णय यावेळी घेण्यात आला. कुडाळ शहराच्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कुडाळ शहराच्या भविष्यातील विकासाच्या संदर्भातील प्रश्न येणारे प्रश्न व समस्या यावर तोडगा काढण्यासाठी कुडाळ तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी कुडाळ शहरातील व्यक्तीनी एकत्र येत कुडाळ तालुका बचाव समितीची स्थापना केली होती. या समितीची बैठक श्री देव मारूती मंदिर येथे सोमवारी सांयकांळी संपन्न झाली. या कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर संजय पडते, कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती सुनील भोगटे, राजु राऊळ, माजी दि. प. सदस्य संजय भोगटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, नगरसेवक ओंकार तेली, सचिन काळप, इजाज नाईक, बाळा वेंगुर्लेकर, नगरसेविका संध्या तेरसे, राजन बोभाटे, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, संतोष शिरसाट, प्रशांत राणे, राजेश पडते, पी. डी. शिरसाट, पिंगुळी ग्रा. प. सदस्य बाबल गावडे, अस्मिता बांदेकर, संदेश पडते, सर्फराज नाईक, सुशिल पडते, राजु बक्षी, राजन नाईक, संजय.पिंगुळकर, अनंत कुडाळकर, अतुल सामंत, ओंकार देसाई, सुधाकर कुलकर्णी, चेतन धुरी, तसेच शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. या बैठकीत कुडाळ शहरातील विविध प्रश्न समस्या सोडविण्याबाबत आवाज उठविण्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वांनी महामार्गाच्या चौपद्रीकरणात कुडाळ शहरातुन बॉक्सवेल करण्यात येत असुन यामुंळे कुडाळच्या विकासावर दिर्घकालीन परीणाम होणार त्यामुंळे या बाबत आवाज उठविणे गरजेचे आहे असे सांगितले. कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरण प्रश्नी आंदोलन करताना कसाल ते झाराप तसेच इतर गावातील ही प्रश्न समस्या सुटण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे असे मत ही यावेळी व्यक्त करण्यात आले. या बाबत सर्वांनी सहमती दर्शवत संपुर्ण तालुक्याचेच प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करण्याचे निश्चित केले. यावेळी पी. डी. शिरसाट यांनी सर्व गावातील प्रश्न सुटे पर्यंत लढा दिला पाहीजे असे सांगितले. आंदोलन पुर्वतयारीसाठी १२ गावात बैठका. तालुक्यातील सर्व महामार्ग बाधीत १२ गावातील समस्या, प्रश्न जाणुन घेण्यासाठी व महामार्ग बंद आंदोलनला प्रतिसाद मिळणे करीता समितीच्या वतीने शुक्रवार दि.१३ रोजी कसाल ग्रामपंचायत येथे स.११ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.तर ओरोस येथे दु १२ वा., हुमरमळा दु. १२:३०, पणदुर दु. १:३० वा., वेताळ बांबर्डे दु. २:१५ वा., पिंगुळी ३:३० वा., बिबवणे ४:१५ वा., तेर्से बांबर्डेे सं. ५ वा., साळगाव ५:४५ वा., झाराप ६:३० वा., व पावशी येथे ७:३० वाजता या बैठकीचे आयोजन ग्रामपंचायतीमध्ये केले आहे.

  • कुडाळ
  • 09-07-2018 15:54:47
  • 299


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.