जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव

कुडाळ (प्रतिनिधी) पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जनहिताच्या योजना व उपक्रम सदैव राबविण्यासाठी प्रयत्नशील असणार असे आश्वासन यावेळी नगरसेविका जाधव यांनी दिले. धुर मुक्त भारत व महीलांचे आरोग्य चांगले रहावे या करीता केंद्र सरकारच्या वतीने देशात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित केली असुन या योजनेतंर्गत महीलांना गॅस व सिलेंडरचे वाटप करण्यात येते. याच योजने अंतर्गत कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप कुडाळ नगरसेविका जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयभीम युवक मंडळाचे माजी अध्यक्ष, विजयकुमार जाधव, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर, सिंधुदुर्ग एच. पी. गॅस वितरक अनुप तेली, कुडाळ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास कुडाळकर, माता सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशिला कुडाळकर, रजनीकांत कदम, पांडुरंग कुडाळकर, दाजी कुडाळकर, आप्पा कुडाळकर,; जनार्दन कुडाळकर, प्रविण कुडाळकर, देवदय कुडाळकर, नितेश कुडाळकर तसेच लाभार्थी व इतर महीला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेविका सरोज जाधव यांनी सांगितले की, स्वंयपाक करताना चुलीच्या धुरामुंळे महीलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परीणाम होत असुन वेळेचा ही अपव्यय होत आहे. आता प्रत्येकाच्या घरात केंद्र सरकारच्या योजनेमुंळे गॅस येणार असल्याने येथील महीलांचे आरोग्य चांगले राहणार असुन वेळेची ही बचत चांगल्या प्रकारे होणार आहे. या योजने सारख्या इतर सर्व जनहिताच्या योजना व उपक्रम या आपल्या नगरात सदैव राबविण्यासाठी प्रयत्नशील असणार असे आश्वासन ही त्यांनी दिले. तर अनुप तेली यांनी सांगितले की, या ठिकाणच्या सर्व कुंटुंब प्रमुख महीलांना केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत गॅस सिंलेडर मिळावा यासाठी सरोज जाधव, विलास कुडाळकर यांनी विशेष मेहनत घेतली असुन लवकरच येथील सर्व कुंटुंब प्रमुख महीलांना या योजनेतंर्गत गॅस सिंलेडर देण्यात येणार आहे असे सांगत सर्वांना गॅस सिंलेडर कसा वापरावा, दक्षता कशी घ्यावी, आपतकालीन स्थितीत काय करावे तसेच इतर आवश्यक माहीती दिली.

  • कुडाळ
  • 09-07-2018 11:01:20
  • 145


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.