माजी खासदार निलेश राणे लोकसभा किंवा विधानसभेचे उमेदवार -नारायण राणे

मालवण (प्रतिनिधी) मी देईन तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे असे सांगून येत्या लोकसभा निवडणुकीबरोबरच मालवण - कुडाळ विधानसभा मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने निवडणूक लढवतील असे सुतोवाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी मालवण येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. कोळंब येथील समर्थ मंगल कार्यलयात मालवण तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज सायंकाळी संपन्न झाला. यावेळी नारायण राणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिप बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकध्यक्ष मंदार केणी, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, सुहास हडकर, लीलाधर पराडकर, जिप सदस्य सरोज परब, जिप सदस्य जेरॉन फर्नांडिस, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, कोळंब सरपंच प्रतिभा भोजने, सोनाली कोदे, ममता वराडकर, बाळू कुबल, निलिमा सावंत, मामा माडये तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या चार वर्षात जिल्ह्याचा विकास ठप्प आहे. सत्ताधार्‍यांनी अनेक प्रश्‍न प्रलंबित ठेवूनही येथील जनता गप्प आहे मात्र जनतेने जागरूक बनून याचा जाब सत्ताधार्‍यांना विचारायला हवा. आपण जे २५ वर्षात केले यातील एकही काम खासदार, आमदार, पालकमंत्र्यांना करता आलेले नाही. अशी टीका करीत खास. राणे म्हणाले, माझ्या काळात मटका, जुगार, दारू धंदे, वेश्या व्यवसाय हे मी बंद केले होते. मात्र आज गेल्या चार वर्षात ते पुन्हा सुरू झाले आहेत. या विषयी लोकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे जे सत्ताधारी जिल्ह्यात अवैध धंदे सुरू ठेवून येथील भूमी बिघडवत असतील आणि आपण त्याविरोधात आवाज उठविण्याबरोबरच चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करत नसू तर तुमचा, माझा उपयोगच काय? असा सवाल श्री. राणे यांनी उपस्थित केला. भाषणाच्या प्रारंभीच २०१४ साली झालेल्या निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख केला. ते म्हणाले तो माझा पराभव नव्हताच, तो एक अपघात होता. दादा निवडून येणार हा अतिआत्मविश्वास कार्यकर्त्यांना नडला. माझा पराभव करण्याची ताकद विरोधकांत नाही. आपण जागरूक न राहिल्याने आपला पराभव झाला हे शल्य मला टोचत राहिले. असे सांगत मी जे काम केले त्या निवडून आलेल्या आमदार खासदारांनी केले नाही. मालवणात मी सिवर्ल्ड प्रकल्प आणला. त्या सिल्वर्ड चे काम रखडले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आता सुरू झाले असले तरी त्याची मंजुरी माझ्या काळात मिळाली होती. चिपी विमानतळाचे काम २०१४ साली पूर्ण झाले. मात्र गेल्या चार वर्षात सत्ताधारी विमानाची चाचणी घेऊ शकले नाहीत. जिल्ह्याच्या विकासासाठी १५०० कोटी दिले असे बढाई खोर पालकमंत्री सांगतात ते गेले कुठे ? दोडामार्ग एमआयडीसीचे काय झाले? वेंगुर्ला बंदर विकासाचे काम बंद कोणी केले ? असे सवाल राणे यांनी उपस्थित करत पालकमंत्र्यांना अपके लक्ष्य बनवले. जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी आपण हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली. इंजिनियरिंग कॉलेज माझ्या पैशात सुरू केले. महिला भवन सुरू केले. हजारो कोटी रुपये धरणाच्या कामाला दिले. आज धरणाची कामे बंद आहेत. गेल्या २५ वर्षात मी जी कामे केली आताचे सत्ताधारी आमदार खासदार पालकमंत्री यांनी केली काय ? मी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली असताना पालकमंत्र्यांकडून हॉस्पिटलची बदनामी केली जात आहे. त्यामुळे अशी बदनामी करणार्‍यांना मी सोडणार नाही. पालकमंत्र्यांचा याच हॉस्पीटलमध्ये फुकट उपचार केला जाईल त्यांच्याकडून एकही रुपया घेणार नाही असा टोला श्री. राणे यांनी यावेळी लगावला. बदनामी करणार्‍या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात एकतरी गरीबांसाठीचे काम केले आहे का? केवळ मल्टिप्लेक्स हॉस्पिटल उभारण्याच्या गप्पाच त्यांनी माराव्यात. त्यासाठी जागा, निधीची आवश्यकता लागते याचा पत्ताच नाही अशा शब्दांत राणेंनी त्यांची खिल्ली उडविली. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आहे. पाण्याची समस्या, रेशनिंगवर धान्य नाही अशा विविध समस्यां सर्वसामान्यांना भेडसावत असताना स्थानिक आमदार झोपले आहेत. याचा जाब विचारण्याऐवजी लोकही झोपल्याचे दिसून येत आहे. समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी वजन लागते नुसते वजन असून उपयोग नाही अशी टीका श्री. राणे यांनी केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येत्या ऑगस्ट महिन्यापासून स्वाभिमान पक्षाच्या संघटना बांधणीच्या दृष्टीने संपर्क अभियान राबविण्यात यावे व २५ मतदारांमध्ये एक कार्यकर्ता अशी बूथ वाइज विभागणी केली गेल्यास यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वजन वाढलेला नेता नको- ---------------------------------- सिंधुदुर्गाचा विकास २०१४ पासून ठप्प झाला आहे. रस्ते खड्डेमय आहेत. प्रकल्प ठप्प आहेत. नुसते वजन असलेला नेता असण्यापेक्षा सरकार दरबारी वजन असणारे नेते सिंधुदुर्गला हवेत. असा टोला खासदार नारायण राणे यांनी आमदार वैभव नाईक यांचे नाव न घेता लगावला. पालकमंत्र्यांना माझ्या हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार- ----------------------------------------------------------- सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेल्या लाईफ टाईम हॉस्पिटलची बदनामी पालकमंत्री करत आहेत. पालकमंत्र्यांना गरज असल्यास माझ्या हॉस्पिटल मध्ये त्यांना फुकट उपचार योजना जाहीर करणार.एकही योजना, विकास निधी पालकमंत्र्यांनी आणला नाही. असे सांगत खासदार नारायण राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला.

  • मालवण- प्रतिनिधी
  • 04-07-2018 17:41:44
  • 89


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विधानसभेच्या उमेदव.. पूर्ण बातमी पहा.

कोसळलेल्या पावसामुळे मालवणात पाणी घुसले .. पूर्ण बातमी पहा.