महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा होणार?

मालवण (प्रतिनिधी) कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेवून येत्या २०१९ च्या निवडणूकीची तयारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सुरू केल्याची चर्चा असून कुडाळ येथे उद्या गुरूवार दि. ५ जुलै रोजी दुपारी २ वा. होणा-या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या मतदार संघाचा उमेदवार कोण असणार? याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे लावले आहेत. आज (बुधवार) मालवण तालुक्याचा मेळावा तर उद्या (गुरूवार) कुडाळ तालुक्याचा मेळावा आयोजित केला आहे. या दोन्ही तालुक्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असले तरी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू करण्याच्या हेतूने हे मेळावे आहेत. या मेळाव्यातून कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाच्या उमेदवाराची चाचपणी केली जाणार आहे. याबाबत कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. या निवडणूकीत कोणत्या पक्षाशी युती करावी की करू नये याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पाबाबतची भूमिका आणि भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासाची होणारी परवड यावर खासदार नारायण राणे प्रखर मत मांडण्याची शक्यता आहे. आणि या मेळाव्यानंतर घेतल्या जाणा-या पत्रकार परिषदेत याबाबतच्या घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.

  • मालवण
  • 04-07-2018 11:51:46
  • 373


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

माजी खासदार निलेश राणे लोकसभा किंवा विधानसभेचे उमे.. पूर्ण बातमी पहा.

कोसळलेल्या पावसामुळे मालवणात पाणी घुसले .. पूर्ण बातमी पहा.