घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू.

मुंबई (प्रतिनिधी) घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयात परिसरात चार्टर्ड विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमान कोसळलं त्यावेळी वैमानिकासह 4 जण विमानात होते. पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. विमानातीलया चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर लवकुश कुमार (वय 21 वर्ष) व नरेश कुमार निशाद (वय 24 वर्ष) हे दोन तरुण जखमी झाले आहेत.अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचे होते. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या विमानाची 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनकडे विक्री केली होती. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का? हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती. त्याच वेळी ही दुर्घटना घडली. घाटकोपर पश्चिम परिसरात जागृती पार्क परिसरात जीवदयालेन मध्ये बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्डविमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. येथून विमानतळ जवळ असून लहान हेलिकॉप्टरचं प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. तसंच चार्टर्ड विमानांचाही हा मार्ग असल्याची माहिती आहे. घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालया जवळील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे विमान कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं.दुर्घटनास्थळी पोलिसांच्या तपास पथकास अपघातग्रस्त चार्टर्ड विमानात बसविलेला 'ब्लॅक बॉक्स' सापडला आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवानांचे मदतकार्य सुरु आहे. मात्र, या अपघातामागील कारण हे 'ब्लॅक बॉक्स' हे उपकरण उलगडणार आहे. कारण हे उपकरण अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि अपघातग्रस्त विमानाचे ठिकाण ट्रेस करण्यास मदत करतं. हा बॉक्स भगव्या रंगाचा असतो. जेणेकरून अपघातस्थळी भडक रंग पटकन तपास पथकास आढळून येतो. या बॉक्सचे एफडीआर (फ्लाईट डेटा रेकॉर्टर) आणि सीवीआर (कॉकपिट व्हॉइस रेकॉर्टर) हे दोन प्रमुख घटक आहेत. एफडीआरद्वारे अपघाताआधी २५ तासांचा तपशील मिळतो. तर सीवीआरद्वारे अपघातापूर्व २ तासांचा तपशील मिळतो. हे उपकरण आंतरराष्ट्रीय नियमानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या देखरेखीखाली विमानात बसविले जाते. विमानाच्या मागील बाजूस हा ब्लॅक बॉक्स बसविला जातो.

  • मुंबई
  • 28-06-2018 11:08:56
  • 225


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.