नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात होण

नवी दिल्ली (प्रतिनिधि) नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या ३० जूनला प्रथमत: दोन हजार शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात होणार असल्याची माहिती आज खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील उद्योग भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले. यावेळी कृषी व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) महाव्यवस्थापक उपेन्द्र वत्स उपस्थित होते. विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेळया-मेंढयांचे निर्यात करण्याचे पाऊल शासनाद्वारे उचलले जात आहे. पहिल्या टप्प्यात ३० जूनला दोन हजार जिवंत शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात केल्या जातील. निर्यात होणाऱ्या शेळया-मेंढयांची वैद्यकीय तसेच संबंधित तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या खेपेच्या शेळया-मेंढया निर्यात केल्या जातील. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना आखली गेली, असल्याचे श्री. महात्मे माहिती यांनी सांगितले. या नवीन उपक्रमाद्वारे मेंढपाळ, शेळी पालन करणा-या शेतक-यांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पशुधन हे शेतक-यांसाठी ‘एटीएम’ सारखे असते. पशुधनापासून शेतक-यांना आर्थिक लाभ मिळतो असेही ते म्हणाले. भविष्यात शेळया-मेंढया निर्यातीसाठी तत्सम सहकारी संस्था निर्माण करण्यात येण्याचा मानस असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

  • दिल्ली प्रतिनिधि
  • 25-06-2018 16:28:00
  • 154

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा नियमांच्या उल्लंघनाब.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

२०१९ च्या निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराची निर्म.. पूर्ण बातमी पहा.

रत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख को.. पूर्ण बातमी पहा.