रत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार

नवी दिल्ली, (प्रतिनिधि) रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. रत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या . (अशी असणार भागीदारी)- इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे. (पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे असे होणार फायदे)- या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर (क्रूड ऑईल) प्रक्रिया करण्यात येईल. तसेच, पेट्रोल , डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनेही या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. या सोबतच मोठ-मोठया प्रकल्पांसाठी कच्चा मालही या प्रकल्पातून पुरविण्यात येणार आहे. यापूर्वी ११ एप्रिल २०१८ रोजी १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय शिखर संमेलनात सौदी अरामकोने भारतासोबत आरआरपीसीएल प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला असून आज एडनॉक समूहाला सहगुंतवणूकदार केले आहे.

  • नवी दिल्ली
  • 25-06-2018 16:07:27
  • 198


लोकांच्या प्रतिक्रिया

अरविंद मोंडकर 26-06-2018 10:51:37

हा प्रकल्प रद्द व्हावा ,, निसर्गरम्य कोकणाची दशा अवस्था बिकट होणार,, त्या पेक्षा पर्यटनास वाव द्या

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

२०१९ च्या निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराची निर्म.. पूर्ण बातमी पहा.

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेळया-मेंढया आखा.. पूर्ण बातमी पहा.