ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चालविण्याचा परवाना, पडवे येथ

सिंधुदूर्ग (प्रतिनिधी) रक्तदान शिबीरासाठी जाणा-या ओरोस जिल्हा रूग्णालयाच्या ब्लड मोबाईल बसने व-हाड घेवून जाणा-या इको कारला पडवे येथे धडक दिली. या धडकेत वधूचा हात फ्रॅक्चर झाला. या अपघातातील ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ ही बस चालविण्याचा परवाना नव्हता. अशी माहिती पुढे येत आहे आणि त्यामुळेच या अपघाताचे प्रकरण मिटविण्यात आले. अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. शासकिय वाहनाचा अपघात होवून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओरोस येथील जिल्हा रूग्णालयाची ब्लड मोबाईल बस कसालच्या दिशेने रक्तदान शिबीरासाठी जात होती. पडवे मार्गे ही बस जात असताना खोटलेवरून कट्टा येथे लग्न समारंभासाठी इको कारमधून व-हाड जात होते. या कारमध्ये वधू होती. पडवे येथे या गाड्या आल्यावर बसच्या चालकाला रस्त्याच्या वळणाचा अंदाज आला नाही. आणि त्यांने त्या कारला धडक दिली. यामध्ये चालकासह वधू जखमी झाली. वधूचा हात फ्रॅक्चर झाला. तिच्यावर तात्काळ उपचार करून लग्न समारंभ ही पार पडला. पण या अपघाताची नोंद झाली नाही. शासकिय वाहन असून सुध्दा याबाबत नोंद केली नाही. हे प्रकरण मिटविण्यात आले. आणि ही बस जिल्हा रूग्णालयाच्या आवारात उभी करून ठेवण्यात आली. यामागे महत्वाचे कारण म्हणजे एनआरएचएम मधून नियुक्ती केलेल्या या बसच्या चालकाजवळ बस चालविण्याचा परवानाच नव्हता. परवाना नसणा-या चालकाजवळ येवढी बस कोणी चालविण्यास दिली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना याची कल्पना दिली होती का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

  • सिंधुदूर्ग -प्रतिनिधी
  • 24-06-2018 07:16:41
  • 430


लोकांच्या प्रतिक्रिया

Pratik thakur 24-06-2018 08:54:44

Barobar aahe parvana ny tr to gunha aahe .. Yogyti karvai zali pahije...

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.