कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये कलाविष्कार

कुडाळ- येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये देवरूख आर्ट एण्ड डिझाईनिंगच्या विद्यार्थ्यानी कलाविष्कारातुन समाजातील विविध विषयावर चित्रण अभिव्यक्त केले . हे चित्रकला प्रदर्शन पाहण्याची विद्यार्थी व कला रसिकांना ५ जून पर्यंत संधी आहे. कुडाळ पिंगुळी येथील तृप्ती चव्हाण व बांदा येथील तुषार म्हावळणकर या देवरूख आर्ट एण्ड डिझाईनिंगच्या बॅचलर ऑफ फाईन आर्टच्या विद्यार्थ्यानी कुडाळ नक्षत्र टॉवर येथे त्यांनी साकारलेल्या चित्रकलेतील कलाविष्काराने समाजातील विविध विषयावरील एक्सप्रेशन चित्रांचे प्रदर्शन दि. ३ ते ६ जुन या कालावधीत आयोजीत केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घघाटन आर्ट एण्ड डिझाईनिंगचे प्राचार्य रणजित मराठे यांनी केले. यावेळी रुपेश नेवगी, भूषण जडये, सुधीर चव्हाण, मंगेश चव्हाण, तृप्ती चव्हाण व तुषार म्हावळणकर हे उपस्थित होते. सदरच्या या चित्रकला प्रदर्शनामध्ये या नवोदित चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातुन समाज जिवनातील विविध विषय मांडले असुन या चित्रा मधील वापरण्यात आलेले आकार, आकर्षक रंग रसिकांचे मन आकर्षित करते तर काही चित्रातील गुढ भाव रसिकांना त्या चित्रामध्ये अंतमुख करायला लावतात. तृप्ती हिने द पिपल, लाईफ आफ्टर लाईफ, मोशन, गॅसेफ, द मनी, थीकींग, कलर फूल बर्डस्, स्ट्रींग पपेट, थॉटस् , या विषयावर चित्रे रेखाटली आहेत तर तुषार ने प्ले स्कूल, डायनिंग टेबल , ऑफ रोल , ग्रोथ , मोशफ, द प्लेट या विषयावर चित्रे रेखाटली आहेत.

  • कुडाळ
  • 03-06-2018 11:17:51
  • 650


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.