"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधानसभेसाठी शड्डू

पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त मुळशी तालुका ढवळून निघाला. या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष शांतारामदादा इंगवले यांनी केलेल्या जोरदार नियोजनामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची मशागत सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. मुळशी तालुक्‍यातील भूगाव येथे ही कुस्ती स्पर्धा जोरदार उत्साहात आणि प्रचंड गर्दीत पार पडली. अभिजित कटके याने "महाराष्ट्र केसरी'ची गदा पटकवली. मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात कुस्तीत अग्रेसर मानला जातो. तसेच महाराष्ट्राच्या मातीचे कुस्ती आणि राजकारणाशी एक आगळेवेगळे नाते आहे. कुस्तीचा आखाडा गाजवणारे मल्ल भविष्यात राजकारणाचा फडही गाजवतात, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पुणे जिल्ह्यात मामासाहेब मोहोळ, विदुरा नवले हे मुळशीतील नावाजलेले मल्ल हे राजकारणातही यशस्वी ठरले होते. शक्ती आणि युक्तीचा खेळ असणारी कुस्ती राजकारण्याचा पाया तयार करत असते. त्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनातून राजकीय कार्यकर्त्यांना आपली ताकद आजमावता येते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा एकदा यशस्वी केला की, विधानसभेच्या लढ्यासाठी शड्डू ठोकायला सज्ज होतात. भोसरीचे कुस्तीप्रेमी आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून थेट आपले मामे सासरे विलास लांडे यांच्याविरोधात दंड थोपटले व विधानसभा निवडणुकीची कुस्ती चीतपटही मारली. त्यानंतर पुण्यातील वारज्याचे नगरसेवक सचिन दोडके यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून खडकवासला मतदारसंघात विधानसभेची जोरदार तयार सुरू केली आहे. आता पुणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते असलेले शांतारामदादा इंगवले यांनी भोर विधानसभा मतदारसंघाच्या स्पर्धेत उडी घेतल्याची चर्चा आहे. भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍याचा मिळून झालेल्या या मतदारसंघात मुळशी हा इंगवले यांचे "होम पीच' आहे, तर पक्षाचे निरीक्षक म्हणून गेली दहा वर्षे वेल्हे तालुक्‍याशी त्यांचा सतत संपर्क आहे. तसेच, मागील विधानसभेवेळी विक्रम खुटवड यांच्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट त्यांची जमेची बाजू आहे. तरीही भोर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे एकेकाळी तडजोडीच्या राजकारणात कॉंग्रेसला सोडलेला मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी तीनही तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह असतो. मात्र, भविष्यात सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यास थोपटे आपला बालेकिल्ला सोडण्यास तयार नसणार. त्यामुळे इंगवले किंवा राष्ट्रवादीतील इतर इच्छुकांचे मनसुबे या पुढील राजकीय डावपेंचावर ठरणार आहेत. मात्र, इंगवलेंनी महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरींपासून संजय राऊत, राधाकृष्ण विखे पाटील, बच्चू कडू या सर्वपक्षीयांचा योग्य "पाहुणचार' करून वातावरण तापवले आहे. या वातावरणाचा त्यांना फायदा होणार की त्या आधीच त्यांना चितपट व्हावे लागणार, याची उत्सुकता आहे.

  • नितिन पंडित
  • 03-06-2018 05:45:00
  • 20


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

काँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्ह.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.

दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.

पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार .. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

चंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.

जि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.

विश्‍वजित कदम यांच्याविरोधात भाजप उमेदवार देणार .. पूर्ण बातमी पहा.

मी किती दिवस जंगलात राहिलो? : प्रकाश आंबेडकर .. पूर्ण बातमी पहा.