पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार घोडांची निवडणूक आयोगाकडे

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून पैशांचे वाटप सुरू केल्याचा आरोप करीत याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पालघरचे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. पालघरमध्ये पोटनिवडणुकीत एकेकाळचे मित्रपक्ष शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामन वनगा यांच्या मुलाला तिकीट दिल्याने दोन्ही पक्षातील संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले. प्रचारादरम्यान तर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात जोरदार टीकास्त्रही सोडले होते. एकीकडे मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ क्‍लिप गाजत असताना दुसरीकडे आमदार घोडा यांनी तर थेट निवडणूक आयोगाकडेच भाजप पैसे वाटत असल्याची तक्रार केली आहे. आयोगाला पाठविलेल्या पत्रात घोडा यांनी म्हटले आहे, की भाजप उमेदवाराला मत देण्यासाठी मतदारांना आमिष दाखविले जात आहे. पैशाचे वाटप केले जात आहे. भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हाही दाखल केला आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, हा आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याने कारवाई व्हावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

  • कापरे
  • 27-05-2018 06:23:11
  • 61


लोकांच्या प्रतिक्रिया

राम भाउ 29-05-2018 10:21:46

पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार घोडांची निवडणूक आयोगाकडे - गुड

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

काँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्ह.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.

दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.

"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधान.. पूर्ण बातमी पहा.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

चंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.

जि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.

विश्‍वजित कदम यांच्याविरोधात भाजप उमेदवार देणार .. पूर्ण बातमी पहा.

मी किती दिवस जंगलात राहिलो? : प्रकाश आंबेडकर .. पूर्ण बातमी पहा.