कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी धाऊन आल्याचे समाधान वाटले

मागील आठवड्यात नऱ्हे ता.हवेली,जि.पुणे या गावातीलच नव्हे तर ननऱ्हे परिसरातील सर्वसामान्य मध्यमवर्गीग बांधकाम व्यावसायीकच नव्हे तर येथील सामान्य माणसाची देखील पीएमआरडीएच्या त्या धडक कारवाईमुळे झोप उडली होती. येथील ग्रामस्थ पीएमआरडीएच्या येथे आलेल्या महाकाय अशा त्या एक्सेव्हटर कटर मशिनच्या धास्तीने भयभीत झाले होते. पोलिसांची मोठी कुमक त्याचबरोबर जेसीबी- एक्सेव्हटर मशीनच्या खडबडाटाने नागरिकांना दोन दिवस अगदी नकोसे झाले होते.पुणे महापालिकेत घेऊ घेऊ म्हणून घेतले तर नाहीच उलट पीएमआरडीएचे हे भुकेलेले भूत गावांच्या माथी बसवत आता धडक अतिक्रमण कारवाईचे नावाखाली या गावांनाच वेठीस धरले जात आहे. सत्ताधारी भाजपाचे नेते व या पक्षाचे हितचिंतक पुणे शहरालगतच्या या गावांकडे आज खरंतर सोन्याची कोंबडी म्हणूनच पाहताना दिसत आहे.येथील समाविष्ट गावांचा ना कोणता विकास आराखडा केलाय.. ना अजून कोणते नियोजन.. मात्र तरीही प्रशासनाकडून अवैध बांधकामे रोखण्याचे नावाखाली अतिक्रमण विरोधी कारवाई जोरात सुरु झालेली आहे.आज पुणे शहरालगतच्या या दहा- पंधरा मोठ्या गावांतील हजारो रहिवासी व येथील हजारो मिळकतदार अक्षरशः हवालदिल झाले असतानाही सत्तेत मश्गुल असलेले सत्ताधारी भाजपाचे नेते- लोकप्रतिनिधी केवळ मुग गिळून गप्प आहेत.गेल्या सहा-सात महिण्यांपासून तर शिवणे, उत्तमनगर,कोंढवे - धावडे, कोपरे,नांदेड,धायरी, नऱ्हे, आंबेगाव बुद्रुक तसेच वारजे व इतर परिसरातील मोठ्या गावातील सामान्य नागरिक व लहान- सहान बांधकाम व्यावसायिक खरंच चिंतातूर झाले आहेत.आपल्यासाठी कोणी खमका नेता रस्त्यावर उतरू शकत नसल्याचे चिंतेने स्थानिक नागरिक व बांधकाम व्यावसायिक पालिका - पीएमआरडीएचे कारवाई चे विरोधात ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत.उलट कारवाईचे भितीपोटी या दोन्ही विभागांचे काही मध्यस्त व दलालांना चिरीमीरी देऊन कारवाई थांबविण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. मध्यंतरी शिवणे गावातील अशाच एका कारवाईला विरोध करताना स्थानिकांची ससेहोलपट झाली होती.तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे विरोधालाही त्या वेळी मुजोर अधिकार्यांनी दाद दिली नव्हती.खरंतर नवीन बांधकाम व्यावसायिक व स्थानिकांस एकट्याने विरोध करताना काहीशी मर्यादा येत असल्याने पुणे महापालिका व पीएमआरडीए च्या अशा अतिक्रमण विरोधी पथकाचे नेहमीच फावते.त्यातच अशा प्रत्येक कारवाईचे वेळी लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींचे फोन-मोबाईल बंद असतात किंवा ते काही महत्त्वाचे कामानिमित्त बाहेरगावी जात असतात.हे आजपर्यंत अगदी नित्यनियमानेच घडत आले आहे.खरंतर हे सारं अगदी ठरवूनच होत असते.मागील गुरुवारी नऱ्हे येथील घटना मात्र यापेक्षा खुपच वेगळी ठरली. पीएमआरडीएच्या अवैध बांधकाम विरोधी मोहिमेचे एक पथक मोठ्या पोलिस बंदोबस्तात येथील दहा ते अकरा इमारतींवर हातोडा फिरविण्यासाठी सकाळी सकाळी नऱ्हे-मानाजीनगर येथे दाखल झाले.नेहमीप्रमाणे ज्यांच्याकडून आधार मिळेल अशी अपेक्षा वाटत होती असे माननीय कोणाचेच फोन स्विकारत नव्हते.तर काहींचे मोबाईल स्विचऑफ येत होते. मोठ्या पोलिस बंदोबस्तात येऊन तासा-दोन तासात एक पाच मजली इमारत निम्म्या पेक्षा अधिक पाडली गेली होती. येथीलच कोणाला तरी सुचले व त्याने.सहज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांना या बाबतीत कल्पना दिली. कोंडे अगदी तातडीने कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहचले.नगरसेवक हरिदास चरवड,पंचायत समितीच्या सदस्या ललिताताई कुटे,स्थानिक कार्यकर्ते राजाभाऊ वाडेकर या सर्वांनी मिळुन पीएमआरडीए चे अधिकार्यांना विनंती..याचना करून ही कारवाई थांबवण्यासाठी साद घातली. रमेश कोंडे,हरिदास चरवड, ललिताताई कुटे,राजाभाऊ वाडेकर व जयसिंगदादा दांगट-पाटील,महेश पोकळे, निलेश गिरमे,श्री.रानवडे या मंडळींच्या विरोधाची तिव्रता पाहून अधिकार्यांनी पाडत असलेली हि इमारत झाल्यानंतर लगेचच पूढील कारवाई थांबवु म्हणून वेळ मारून नेली.निवेदन स्विकारुन त्यांनी येथील वातावरणही शांत केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास वाटला म्हणून दुपारच्या नंतर ते सगळेजण आपआपल्या मार्गाने येथून निघूनही गेले होते.मात्र पीएमआरडीए चे अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे मनात वेगळेच काही तरी सुरू होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा इतर इमारतींवर कारवाई करण्यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त मागवून पुन्हा कारवाई हाती घेतली.आणि जी भिती वाटत होती तसेच घडू लागले.नेतेमंडळींनी नेहमी प्रमाणे आपले मोबाईल बंद ठेवले.काय करावे हे कोणालाच समजेना. येथील एका नागरीकाने एका अपेक्षेने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांना कळवा म्हणून सल्ला दिला.आज पुन्हा कारवाई सूरु केल्याचे त्यांना सांगितले.रमेश कोंडे यांच्या स्वता:चे गावात त्याच दिवशी सरपंच पदाची निवडणूक. होती.गावात निवडणूकीचीच तयारी सुरु होती.सकाळी सकाळी त्यांना तेथेच उपस्थित रहावे लागणार होते.मात्र गावातील कोणी नाराज होईल न होईल याची फिकीर न करता रमेश कोंडे हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नऱ्हे येथे कारवाईचे ठिकाणी पोहचले.अधिकारी शब्द देऊनही पाळत नाहीत व पुन्हा पुन्हा कारवाई करू पहातात या बद्दल त्यांनी तीव्र भावना व्यक्त केली.रमेशबापू कोंडे यांनी या कारवाईला अतिशय तिव्र विरोध केला. नऱ्हे येथील या कारवाईचे बाबतीत त्यांनी प्रशासनास अगदी खडे बोल सूनावले. शिवसेना कायमच सर्वसामान्य माणसा बरोबर असते तशीच ती या अतिक्रमण कारवाई विरोधात देखील आहे. सर्वसामान्य माणसाने मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या इमारतींवर अशा प्रकारे कारवाईचा बडगा उगारला जात असेल तर ते निंदनीय आहे असेही ते म्हणाले. या इमारती उभ्या होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? आणि आता सामान्य माणसाने कष्टातुन व कर्ज काढून अशी इमारती उभी केली तर ती पाडणे कितपत शोभते असा सवाल करून राजकीय द्वेष मनात धरून कि आर्थिक हितासाठी ह्या इमारती पाडणार असा सवाल त्यांनी केला.अशा जुलमी कारवाईने सामान्य माणसाच्या संसाराची होळी होणार असेल व आपण एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून ही कारवाई थांबवु शकत नसेल तर एक कार्यकर्ता म्हणून मी स्वतः या ठिकाणी तुमच्या समोरच आत्महत्या करेल अशी गर्भीत धमकीच त्यांनी दिली. अतिशय. परखड शब्दात प्रतिक्रिया देत त्यांनी उद्विग्न होत आपली भावना व्यक्त केली. होणाऱ्या संभाव्य परिस्तिथीचा विचार करून प्रशासनाने पाऊले उचलावीत नाहीतर येथे शिवसेना रस्त्यावर उतरले असा इशाराच देत प्रत्येक वेळी धर्मा पाटील बनुनच न्याय मिळणार असेल तर आपण स्वतः धर्मा पाटील बनू असे ते म्हणाले.त्यामुळे येथील वातावरणही तणापूर्ण झाले. शेकडोंचा जमाव व परिस्थिती पाहून कारवाई थांबविण्याशिवाय पीएमआरडीए व पोलीस प्रशासनसमोर पर्यायच उरला नाही.नगरसेवक हरिदास चरवड,पंचायत समितीच्या सदस्या ललिताताई कुटे, माजी सभापती प्रभावतीताई भूमकर,माजी सरपंच भुषण रानवडे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाडेकर,उपशहर प्रमुख जयसिंगदादा- दांगट, तालुका प्रमुख दत्तानाना रायकर,विभाग प्रमुख महेश पोकळे, निलेश गिरमे, बाळासाहेब खेडेकर यांनी देखील या बाबतीत खंबीर भूमिका घेत कोंडे यांची बाजू लावून धरली.आमदार भिमराव(अण्णा) तापकीर हे देखील नंतर या ठिकाणी पोहचले या कार्यकर्त्यांसह त्यांनी अधिकारी व पोलीसांच्या बरोबर चर्चा केली.राजकीय भूमिकेतुन- अपरिहार्येतुन का होईना प्रथमच या अतिक्रमण कारवाईचे ठिकाणी सर्वच लोकप्रतिनिधी आले होते.या सर्वांनी देखील एकत्र येऊन या अतिक्रमण कारवाईस विरोध केला हे सुद्धा विशेष म्हणावे लागेल.अतिक्रमण कारवाई सुरु असताना जाणीवपूर्वक संपर्क टाळणारे.. मोबाईल न उचलणारे निदान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उशीरा का होईना या ठिकाणी धावले हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शिवसेनेच्या रमेशबापु कोंडे यांचा आक्रमक पवित्रा देखील यासाठी कामी आला असेच म्हणावे लागेल.असो निदान भूमीपुत्रांसाठी संकटसमयी का होईना कोणी तरी पुढे येऊन आम्हांला सावरले.खरोखरच याचा नऱ्हे ग्रामस्थ व इतर गावातील नागरिकांना देखील आनंद वाटला.प्रत्येकाचे मनाला याचे निश्चितच समाधान वाटले.महापालिका.. पीएमआरडीए च्या सततच्या अशा कारवाईने केवळ चार-दोन बिल्डर मंडळी किंवा दहा- वीस मिळकतदारच ग्रासलेले नाहीत तर अशा मिळकत दारांची ही संख्या हजारोंच्या वर आहे.लाखों नागरिकांना याचा फटका बसतोय हे आता सर्वांनीच जाणले पाहिजे.त्यामुळे हे संकट काल परवा शिवणे गावात कोणावर तरी आले होते. आज ते नऱ्हे येथील चार - दोघांवर आले आहे पण कदाचित उद्या ते आपल्या कोणावर तरी येऊ शकते याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणूनच तर प्रत्येकाने आपापल्या परिने का होईना या अश संकटाचा एकजुटीने सामना करण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे.नऱ्हे येथे ज्या एकजुटीने सर्वच जण आले व त्या सर्वांनीच एकजुटीने जी मदत केली त्या सर्वांचेच अगदी मनापासून आभार. *आपला नम्र..* एक सामान्य शोषित- ग्रामस्थ व रहिवासी मिळकतदार..

  • कापरे
  • 24-05-2018 05:34:00
  • 1014

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

नऊ तासांत पन्नास गणेश मंडळांना भेटी : महादेव बाबरच.. पूर्ण बातमी पहा.

काँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्ह.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.

दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.

"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधान.. पूर्ण बातमी पहा.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.

पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार .. पूर्ण बातमी पहा.

चंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.

जि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.