लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद , मेटेंची भूमिकाही अस्पष्टच

बीड : बीड - उस्मानाबाद - लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीला आता रंगत आली असून सर्वच उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधले अशी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांची ओळख आहे. मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मेटे दुखावलेले असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दलही औत्सुक्‍य आहे. तर, भाजपच्या हक्काचे पाच मतदार अपात्र झाले असून एकाने पक्षांतर केले असून एकजण नाराज आहे. त्यामुळे भाजपला या 12 मतांच्या जुळवणीचे आव्हान आहे. लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मतदान नऊ दिवसांवर येऊन ठेपले आहे. आजघडीला भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या मतदारांची संख्या तीनशेवर असली तरी विजयासाठी पाचशेचा आकडा पार करायचा आहे. त्यामुळे एकेक मताला मोठे मूल्य आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, विनायक मेटे यांच्याकडे चार जिल्हा परिषद सदस्य आणि एक सभापती अशी पाच मते आहेत. तुलनेने ही संख्या कमी असली तरी भाजपसाठी हा आकडाही महत्वाचा आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषदेला मदत केल्याची परतफेड म्हणून माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे धस यांना विजयी करणे पंकजा मुंडेंसाठी राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. मात्र, मेटे आणि मुंडेंमधील अलिकडचे राजकीय संबंध पाहता मेटे आपली पाच मते भाजपच्या पारड्यात टाकतील का, याबाबत शंका आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या भेटीमुळे दोघांत आलेला दुरावा जिल्हा परिषदेमधील सत्तेमुळे कमी झाला. पण, पुन्हा दोघांतील राजकीय वितुष्टाला जिल्हा परिषदेचा कारभारच काणीभूत ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या कारभाराचे गाऱ्हाणे मेटेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात नेल्याचे मुंडेंना रुचले नाही. तर, मेटेंच्या पुढाकाराने नियोजित आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनावरुन भाजप पदाधिकाऱ्यांनी मेटेंना चांगलेच खिंडीत गाठले. एवढेच नाही तर या मुद्द्यावरुन मेटेंची राजकीय खिल्ली उडविण्याची संधीही या पदाधिकाऱ्यांनी सोडली नाही. त्यामुळे मेटे चांगलेच दुखावलेले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या कुठल्याच प्रक्रियेत अद्याप मेटे दिसले नाहीत. त्यांना भाजपने गृहीत धरले कि बेरजेतून सोडले हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे मेटे काय भूमिका घेणार असा प्रश्न असून खिंडीत गाठणाऱ्या भाजपला तेही खिंडीत गाठणार का हे लवकरच कळेल.

  • जाधव
  • 12-05-2018 12:41:41
  • 182


लोकांच्या प्रतिक्रिया

Ajay Aglave 19-05-2018 07:18:10

धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन; ३२० निसर्ग पर्यटन स्.. पूर्ण बातमी पहा.

राज्यातील शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन; कायदेशीर.. पूर्ण बातमी पहा.

एसटीच्या ११४८ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, तड.. पूर्ण बातमी पहा.

तारकर्लीतील स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडी संस्थेमा.. पूर्ण बातमी पहा.

१३ जूनपासून पुन्हा डॉक्टर संपावर ?.. पूर्ण बातमी पहा.

रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार - पर्यावरणमंत्.. पूर्ण बातमी पहा.

कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ.. पूर्ण बातमी पहा.

मुंबईकरांना खुशखबर, ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त ठ.. पूर्ण बातमी पहा.

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे 6 निर्णय.. पूर्ण बातमी पहा.

राज यांनी मोदींना जोरदार ठोकले; पण शिवसेनेला सोडले.. पूर्ण बातमी पहा.