औरंगाबादमधील , तणाव कमी, एसीपी कोळेकर हे गंभीर जखमी.

औरंगाबाद : मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर अफवा पसरू नयेत म्हणून औरंगाबादेतील इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. शुकवारी (ता. 11) दोन गटात लाठ्याकाठ्या आणि तलवारीने मारहाण झाल्यानंतर मोठी दंगल उसळली. पोलिसानी दंगेखोरांवर प्लास्टिक बुलेट्‌स आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शहरात त्यानंतर आज पहाटे पुन्हा उद्रेक झाला. दरम्यान सोशल मीडियावरून या घटनेचे फोटो, व्हिडिओ आणि अफवा पसरवल्या जात आहेत. अफवामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते अशी शक्‍यता आहे , संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. काही टेलिकॉम कपंण्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून उर्वरित सर्व टेलिकॉम कंपन्यांची इंटरनेट सेवा दुपारी दोनपर्यंत बंद होतील. 48 तासांसाठी इंटरनेतसेवा बंद राहणार आहे असे आयुक्त भारंबे यांनी सांगितले. तणाव, हवेत गोळीबार, अश्रूधुराचा वापर शहरातील दंगलग्रस्त परिस्थिती पोलीसांनी नियंत्रणात आणली असून, अद्याप तणाव शांत झाला असे म्हणता येणार नसल्याचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. गांधीनगर भागात दोन व्यक्तींमध्ये झालेला वादाचे हिंसक भांडणात रुपांतर होवून पोलीसांपर्यंत माहिती येईपर्यंत त्याचे दंगलीत रुपांतर झाले होते. पोलिसांनी परिस्थीती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शनिवारी पहाटेच्या सुमारास नवाबपुरा, गांधीनगर, शहागंज, निजामुद्यीन, गांधीपुतळा, चेलीपुरा येथे प्लास्टिक बुलेट फायर करण्यात आल्या. सुरुवातीला हवेत त्यानंतर जमावाच्या दिशेने हा फायर होता. यात नवाबपुरात एक जण दगावल्याचे तर एक जण घराला लागलेल्या आगीत जळाल्याची माहिती विनायक ढाकणे यांनी दिली. पोलीस बंदोबस्त आयआरबी व एसआरपीच्या जवानांच्या चार तुकडया दंगल नियंत्रण पथकाच्या वीस जवानांच्या चार तुकडया सध्य शहरात तैनात असुन, सर्व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरविला आहे. यासाठी सुट्‌टीही रद्‌द करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सकाळीच शहरात दाखल झाले असुन, त्यांच्या नियंत्रणात व मार्गदर्शनात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ढाकणे म्हणाले. शहरात टॅकरनी पाणी उपलब्ध करुन जाळपोळीच्या ठिकाणी मदत पोहचविण्याचे काम सुरु आहे. यासाठी शहरातील खाजगी विहीरी व व्रौंतीचौक येथील जलकुंभावरील मदत पोहचविण्याचे काम सुरु आहे. काल रात्री पासुन सुरु असलेल्या दंगलीत पक्की दुकाने व वाहनांचे नुकसान झाले आहे. या दंगलीत एसीपी कोळेकर हे गंभीर जखमी असुन, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच पोलीस निरीक्षक हेमंत कदम व परोपकारी यांनाही गंभीर दुखापत झाल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

  • जाधव
  • 12-05-2018 12:28:42
  • 133


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या